भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गावात विरोधक चीत
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक यांची मूळ गाव असलेल्या गहुली येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत नाईक गटाने विरोधी गटाला धूळ चारली.
यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक यांची मूळ गाव असलेल्या गहुली येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत नाईक गटाने विरोधी गटाला धूळ चारली.
पुसद तालुक्यातील गहूली वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांचे मूळ गाव. एक हजार लोकसंख्येच्या या गावात आजवर अविरोध निवडणुकीचा पॅटर्न राबविण्यात आला. सात सदस्यीय ही ग्रामपंचायत आहे. या वेळी देखील सर्वसंमतीने सदस्यांची निवड करण्यात येणार होती.
त्यानुसार सहा सदस्यांची निवड देखील झाली. मात्र एका जागेसाठी घोडे अडले. या जागेसाठी भाजप प्रणीत विलास जगननसिंग आडे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली.
गावातील ६३० पैकी ४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार विलास आडे यांना ३०८ तर विरोधी उमेदवार अशोक चव्हाण यांना अवघी १२१ मते मिळाली. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या गावात पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते.