Agriculture news in marathi Opposition to the convocation ceremony of the Agricultural University | Page 2 ||| Agrowon

कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला विरोध 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

दरवर्षी पाच फेब्रुवारी रोजी होणारा दीक्षान्त समारंभ रद्द करून घाईगडबडीत ३० एप्रिल रोजी घेण्याचा खटाटोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चांगलाच अंगलट आला आहे.

नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३० एप्रिलला होणाऱ्या दीक्षान्त समारंभाला विदर्भातील विद्यार्थी संघटनांसोबत बच्चू कडूप्रणीत प्रहार संघटनेने विरोध केला असून, हा समारंभ रद्द करण्याची मागणी केली आहे. 

डॉ.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ दरवर्षी पाच फेब्रुवारीला घेण्याची परंपरा आहे. गेल्या अठरा वर्षांत कधीही या प्रथेला तडा गेला नाही. या वर्षीदेखील पाच फेब्रुवारीला कोरोनाचा तितकासा प्रादुर्भाव नव्हता. राज्य सरकारने देखील टाळेबंदी जाहीर केली नव्हती. त्यामुळे पाच फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ घेणे सहज शक्य होते. मात्र गेल्या अठरा वर्षांपासूनची परंपरा विद्यापीठाने खंडित केली, असा आरोप विद्यार्थी संघटनांचा आहे. सध्या शासनाने सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सोबतच मृत्युदरातील वाढीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

छोटेखानी कार्यक्रमासाठी देखील विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपयांची वसुली केली जात आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का? दीक्षान्त समारंभ विद्यार्थ्यांसाठी उत्सव असतो, तुम्ही विद्यार्थ्यांचा आनंद का हिरावून घेत आहात? असे अनेक प्रश्‍न प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आले आहेत. 

प्रहार संघटनेचे चांदूरबाजार (अमरावती) शहरप्रमुख ऋषभ श्‍यामसुंदर गावंडे यांनी हे निवेदन ई-मेलद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविले आहे. प्रहार सोबतच यवतमाळ येथील पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रणव रमेशराव टोम्पे, महाराष्ट्र कृषी योद्धा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर खरात पाटील यांनी देखील कृषी विद्यापीठाला या संदर्भाने जाब विचारला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री दादा भुसे, अमरावती विभागीय आयुक्त, अकोला जिल्हाधिकारी, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव यांना या निवेदनाच्या प्रति पाठवत दीक्षान्त समारंभ रद्द करून पुढे घेण्याची मागणी केली आहे.

राज्यपालांच्या परवानगीने समारंभ ः डाॅ. काळबांडे
पाच फेब्रुवारीला दरवर्षी दीक्षान्त समारंभ राहतो. या वेळी मात्र काही परीक्षाच फेब्रुवारी महिन्यापर्यंत घेण्यात आल्या. त्यामुळे नाइलाजाने दीक्षान्त समारंभ ३० एप्रिल रोजी घेण्याचे ठरले. तीन हजार दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे. यातील काही विद्यार्थी उपस्थित राहून पदवी घेतील. राज्यपालांनी दृक्‌श्राव्य माध्यमाद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यपालांच्या होकारामुळेच ३० एप्रिल रोजी हा समारंभ घेण्याचा निर्णय झाला. विद्यार्थी उपस्थित राहून पदवी घेत असल्यास एक हजार रुपये आणि अनुपस्थित पदवी घरी पाठवायची असल्यास दीड हजार रुपये आकारले जातात. यात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. कार्यकारी परिषद सदस्यांनी देखील त्याला संमती दर्शविली आहे, असे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...