‘पेगॅसस’ प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी मागणी 

पेगॅसिस प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून सुरू झाली आहे. काँग्रेसने मंगळवारी ही जाहीर मागणी केली.
parliament
parliament

नवी दिल्ली ः पेगॅसिस प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून सुरू झाली आहे. काँग्रेसने मंगळवारी ही जाहीर मागणी केली. तर शिवसेनेने लोकसभाध्यक्षांना निवेदन देऊन पेगॅसिस प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला. 

विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने पेगॅसस प्रकरणात सरकारला घेरण्यासाठी आक्रमक राहण्याची रणनीती आखली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची रणनीती बैठक झाली. संसदेचे कामकाज सुरू होण्याआधी राज्यसभेतील रणनीतीबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, द्रमुकचे तिरुची सिवा, तृणमूल काँगेसचे डेरेक ओ ब्रायन, शिवसेनेचे संजय राऊत, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आदींची बैठक झाली. तर लोकसभेतील व्यूहरचनेसाठी काँग्रेस नेत्यांचीही बैठक झाली. 

दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेस खासदारांनी स्थगन प्रस्ताव देऊन तातडीने या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती. राज्यसभेमध्ये के. सी. वेणुगोपाल, शक्तिसिंह गोहिल यांनी तर लोकसभेमध्ये माणिकम टागोर, गौरव गोगोई या खासदारांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे खासदार शक्तिसिंह गोहिल यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘‘विरोधकांकडून चर्चेसाठी देण्यात आलेल्या नोटिसांची सरकारने दखल घेतली नसल्याची नाराजी व्यक्त केली. राज्यसभेत नियम २६७ अन्वये चर्चेची काँग्रेसची मागणी होती. इस्रायली कंपनी एनएसओने दिलेल्या पेगॅसस साफ्टवेअरद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी स्पष्ट करावे, की पेगॅसस सॉफ्टवेअर सरकारने घेतले आहे किंवा नाही. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी,’’ अशी मागणी केली. 

दरम्यान, शिवसेनेनेही लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पेगॅसस प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशीची मागणी केली आहे. इस्राईलच्या पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे विरोधी पक्षाचे नेते, मंत्री, पत्रकार, संपादक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची पाळत ठेवली जात असल्याची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी केली जावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाने, धैर्यशील माने यांनी लोकसभाध्यक्षांना दिले. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर शिवसेना खासदारांसोबत हजर होते.  दोन्ही सभागृहांत विरोधक आक्रमक  लोकसभेमध्ये सकाळी अकराला सभागृह सुरू होताच लोकसभाध्यक्षांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेस खासदारांनी पेगॅसस प्रकरणात घोषणाबाजी सुरू केल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत कामकाज दुपारी दोनपर्यंत स्थगित करण्यात आले. दुपारनंतरही लोकसभेत कामकाज होऊ शकले नाही. राज्यसभेमध्येही गोंधळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com