agriculture news in Marathi opposition demands inquiry of pegasus Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘पेगॅसस’ प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी मागणी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

पेगॅसिस प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून सुरू झाली आहे. काँग्रेसने मंगळवारी ही जाहीर मागणी केली.

नवी दिल्ली ः पेगॅसिस प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून सुरू झाली आहे. काँग्रेसने मंगळवारी ही जाहीर मागणी केली. तर शिवसेनेने लोकसभाध्यक्षांना निवेदन देऊन पेगॅसिस प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला. 

विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने पेगॅसस प्रकरणात सरकारला घेरण्यासाठी आक्रमक राहण्याची रणनीती आखली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची रणनीती बैठक झाली. संसदेचे कामकाज सुरू होण्याआधी राज्यसभेतील रणनीतीबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, द्रमुकचे तिरुची सिवा, तृणमूल काँगेसचे डेरेक ओ ब्रायन, शिवसेनेचे संजय राऊत, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आदींची बैठक झाली. तर लोकसभेतील व्यूहरचनेसाठी काँग्रेस नेत्यांचीही बैठक झाली. 

दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेस खासदारांनी स्थगन प्रस्ताव देऊन तातडीने या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती. राज्यसभेमध्ये के. सी. वेणुगोपाल, शक्तिसिंह गोहिल यांनी तर लोकसभेमध्ये माणिकम टागोर, गौरव गोगोई या खासदारांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे खासदार शक्तिसिंह गोहिल यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘‘विरोधकांकडून चर्चेसाठी देण्यात आलेल्या नोटिसांची सरकारने दखल घेतली नसल्याची नाराजी व्यक्त केली. राज्यसभेत नियम २६७ अन्वये चर्चेची काँग्रेसची मागणी होती. इस्रायली कंपनी एनएसओने दिलेल्या पेगॅसस साफ्टवेअरद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी स्पष्ट करावे, की पेगॅसस सॉफ्टवेअर सरकारने घेतले आहे किंवा नाही. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी,’’ अशी मागणी केली. 

दरम्यान, शिवसेनेनेही लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पेगॅसस प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशीची मागणी केली आहे. इस्राईलच्या पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे विरोधी पक्षाचे नेते, मंत्री, पत्रकार, संपादक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची पाळत ठेवली जात असल्याची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी केली जावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाने, धैर्यशील माने यांनी लोकसभाध्यक्षांना दिले. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर शिवसेना खासदारांसोबत हजर होते. 

दोन्ही सभागृहांत विरोधक आक्रमक 
लोकसभेमध्ये सकाळी अकराला सभागृह सुरू होताच लोकसभाध्यक्षांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेस खासदारांनी पेगॅसस प्रकरणात घोषणाबाजी सुरू केल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत कामकाज दुपारी दोनपर्यंत स्थगित करण्यात आले. दुपारनंतरही लोकसभेत कामकाज होऊ शकले नाही. राज्यसभेमध्येही गोंधळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले.  


इतर ताज्या घडामोडी
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...