शाळांतील बाक खरेदीस शिक्षण समितीचा विरोध

शाळांतील बाक खरेदीस शिक्षण समितीचा विरोध
शाळांतील बाक खरेदीस शिक्षण समितीचा विरोध

जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी मानव विकास विभागांतर्गत पॉलिमर बाक पुरविण्यात येत असून, संबंधित ठेकेदाराकडून ५ हजार ८०० रुपये इतक्‍या जादा दराने बाक खरेदी होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद शिक्षण समितीमधील सदस्य रवींद्र पाटील यांनी केला आहे. जादा दराने होत असलेल्या खरेदी प्रक्रियेस समितीने देखील विरोध दर्शविला असून, दर कमी करण्याबाबत ठेकेदारास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास बोलाविण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.

सभापती पोपट भोळे, समितीचे सदस्य गजेंद्र सोनवणे, विजया पाटील, नंदा पाटील, रवींद्र पाटील, प्रमिला पाटील, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील आदी उपस्थित होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरवठा होत असलेल्या शालेय पोषण आहाराच्या मालाबाबत गटशिक्षणाधिकारी, अधीक्षकांनी धान्याचा नमुना कार्यालयात ठेवण्याच्या सूचना देण्यात दिल्या.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत सात तालुक्‍यांतील ३८ अभ्यासिका सुरू आहेत किंवा नाही, याचा लेखाजोखा पुढील सभेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत प्रत्येक गटातून दोन शाळांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. वादळाने शाळेत नुकसान झालेल्या १८ शाळांच्या दुरुस्तीबाबत इस्टिमेट आले असून, त्या शाळांना प्राधान्य देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

गटशिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यानंतर चोपडा गटशिक्षणाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे समायोजन झाले नसल्याचे गजेंद्र सोनवणे यांनी सभेत सांगितले. यावरून गटशिक्षणाधिकारी गजरे यांची विभागीय चौकशी लावण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सभेत सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com