Agriculture news in marathi Opposition to land acquisition; Stop the road at Alleppey | Page 2 ||| Agrowon

जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर रास्ता रोको

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा इशारा पुणे जिल्हा रेल्वे कृती समितीचे जिल्हाध्यक्ष नीलेश भुजबळ यांनी दिला. 

आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा इशारा पुणे जिल्हा रेल्वे कृती समितीचे जिल्हाध्यक्ष नीलेश भुजबळ यांनी दिला. आळेफाटा येथे सोमवारी (ता.२) केलेल्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कुऱ्हाडे, प्रसन्न डोके, खेड पंचायत समितीचे माजी सभापती पाटील बुवा गवारी, जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे, पंचायत समितीचे सदस्य जीवन शिंदे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, प्रीतम काळे, विजय कुऱ्हाडे, नवनाथ निमसे, दिनेश सहाणे, उदय पाटील, संजय कुऱ्हाडे, शरद गाढवे, गणेश गुंजाळ, अनिल वाघोले सुंदर कुऱ्हाडे, मिननाथ शिंदे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

हायस्पीड रेल्वे जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली या तालुक्यातून जात असून अनेक शेतकऱ्यांच्या बागायती शेत जमिनींचे अधिग्रहण केले जात आहे. महारेलने मोजणीची प्रक्रिया कुठलीही माहिती न देता मोजणी सुरू केली आहे. या बाबत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला किती मिळणार, या बाबत कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. तसेच या रेल्वे ज्या ठिकाणाहून जात आहे, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी जात आहेत.

उर्वरित क्षेत्राला पाणीपुरवठा कुठून करायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजनेच्या पाइपलाइन आहेत, या बाबत महारेलने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. अनेक प्रकल्पांना या पूर्वी आमच्या जमिनींचे संपादन झाले असल्याने रेल्वे प्रकल्पाला आम्ही जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका घेतली.


इतर बातम्या
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...