शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार : काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा आरोप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेट्रो विभागात आणि शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. 

काँग्रेस आघाडीच्या वतीने मंगळवारी (ता. २४) आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री कार्यालयातून एलएनटीला काम देण्याचा प्रयत्न झाला. सर्व कामे एलएनटीला का मिळत आहेत. कॅगच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असा सवालही या वेळी करण्यात आला. भाजपने शिवस्मारकालाही भ्रष्टाचारातून  सोडले नाही. हिंमत असेल तर आजच मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा खुलासा करावा. आम्ही दुसऱ्या टप्प्यात दुसरी कागदपत्रे समोर आणणार आहोत, असे नवाब मलिक यांनी या वेळी सांगितले. शिवस्मारकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली. 

राज्यात विधानसभेची निवडणूक असताना भाजपने घोषवाक्य दिले होते. ‘छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी के साथ’ असे सांगत पाच वर्षांत वारंवार पारदर्शक कारभार करत असल्याचे सांगितले गेले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील २१ मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले. परंतु आजही मुख्यमंत्री म्हणत आहेत आमच्या सरकारवर आरोप झालेले नाहीत. ते विसरत आहेत, की दोन मंत्री भ्रष्टाचारामुळे वगळण्यात आले. तर उर्वरित मंत्र्यांची चौकशी न करता क्लीन चिट दिली गेली.

मुख्यमंत्र्यांकडील खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोपही विरोधकांनी केला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन झाले होते. मात्र, आजही या स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. उलट याच शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे मलिक आणि सावंत यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com