agriculture news in marathi, opposition leader take a exit, mumbai, maharashtra | Agrowon

अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्याग
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

मुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होण्याआधीच बाहेर पडला असून, हा दोन्ही सभागृहांचा आणि सदस्यांचा अपमान आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.

मुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होण्याआधीच बाहेर पडला असून, हा दोन्ही सभागृहांचा आणि सदस्यांचा अपमान आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.

लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अर्थसंकल्प फोडण्यात आला आहे, असा थेट आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्पातील गोष्टी ट्विट केल्या जात होत्या. या गोष्टी जाहिरातीसह ट्विटवर प्रसिद्ध केल्या जात होत्या. याचा अर्थ याअगोदरच अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या टीमच्या हाती लागला होता, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी सभागृहात पुराव्यानिशी सादर केली. या वेळी अर्थसंकल्प सादर करतानाच तो सोशल मीडियावर कसा येऊ शकतो, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, हाच मुद्दा उपस्थित करीत विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. याच मुद्द्यावर विरोधकांनी अर्थसंकल्प सुरू असतानाच सभात्याग केला. महाराष्ट्राच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर होण्याआधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचे काम यापूर्वी कधी झाले नव्हते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

इतर ताज्या घडामोडी
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...