agriculture news in Marathi, opposition leader will decide today, Maharashtra | Agrowon

विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज चव्हाण, वडेट्टीवार नावे चर्चेत

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. सोमवारी (ता.२०) यासंदर्भातील प्रक्रिया मुंबईत पार पडणार असून, या पदावर कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे. पृथ्वीराज चव्हाण, विजय​वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत.

नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. सोमवारी (ता.२०) यासंदर्भातील प्रक्रिया मुंबईत पार पडणार असून, या पदावर कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे. पृथ्वीराज चव्हाण, विजय​वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत.

लोकसभेकरिता शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी (ता.१९) पार पडले. त्यानंतर लगेच सोमवारी (ता.२०) कॉंग्रेसने विरोधी पक्षनेता निवडीसाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विखे पाटील यांनी मुलासाठी नगर लोकसभेची जागा मागितली होती. आघाडीत ती जागा राष्ट्रवादीकडे होती. ती देण्यास नकार दिल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मुलाच्या प्रचारात सहभागी झाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद सोडावे लागले. त्यांच्या जागेवर नवा नेता सोमवारी (ता.२०) निवडला जाणार आहे. आमदार विजय वडेट्टीवार विधिमंडळ उपनेते आहेत. विदर्भातील दुष्काळग्रस्त समितीचे ते अध्यक्ष आहेत. विरोधकांना अंगावर घेऊन त्यांची कोंडी करण्याची ताकदही त्यांच्यात आहे. चंद्रपूरचे आमदार बाळू धानोरकर यांना शिवसेनेतून त्यांनी कॉंग्रेसमध्ये आणले. शेवटपर्यंत संघर्ष करून लोकसभेची उमेदवारीही मिळवून दिली.

त्यावरून त्यांची पक्षात ताकद वाढल्याचे दिसून येते. विदर्भाला कॉंग्रेसने कुठलेही महत्त्वाचे पद दिलेले नाही. प्रदेशाध्यक्ष मराठवाड्याचे असल्याने विरोधी पक्षनेते पद विदर्भाला देऊन प्रादेशिक समताेल साधल्या जाऊ शकतो, असेही मत कॉंग्रेस नेते व्यक्‍त करीत आहेत. त्यासोबतच संयमी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीदेखील या पदासाठी चर्चा आहे. परंतु पक्षनेतृत्व कोणाच्या गळ्यात ही माळ टाकते हे आजच्या बैठकीअंती स्पष्ट होणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...