agriculture news in marathi, opposition leaders become aggressive on lokmangal issue, mumbai, maharashtra | Agrowon

‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

मुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा संचालक असलेल्या सोलापूरमधल्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करत विरोधकांनी मंगळवारी (ता. २५) विधान परिषदेत गदारोळ केला, यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

मुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा संचालक असलेल्या सोलापूरमधल्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करत विरोधकांनी मंगळवारी (ता. २५) विधान परिषदेत गदारोळ केला, यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

‘लोकमंगल’ने बनावट कागदपत्रे सादर करून शासकीय अनुदान लाटल्याप्रकरणी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यात आलेली नाही, हे प्रकरण राज्य सरकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. या प्रश्नाला उत्तर देताना दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास सुरू आहे, असे सांगत कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही दिली. 

या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे. ‘लोकमंगल’ने या निधीचा गैरवापर केलेला नाही, ही रक्कम त्यांच्याकडून व्याजासकट वसूल केल्याचे श्री. खोतकर यांनी सांगितले. याप्रकरणी लोकयुक्तांनी अहवाल दिल्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल का यासंदर्भात सभापतींनी निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या अनिल परब यांनी केली. यावर सभापतींनी, लोकायुक्तांनी या प्रकरणात काय निर्णय दिला आहे ते तपासून सभागृहाला सांगण्यात येईल, असे सांगितले.

काय आहे प्रकरण?
बोगस कागदपत्रांच्या आधारे दूध भुकटी प्रकल्पासाठी शासकीय अनुदान लाटल्याप्रकरणी लोकमंगल मल्टिस्टेट सहकारी संस्थेचे चेअरमन आणि सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यामुळे लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला दूधशाळा विस्तारीकरण आणि दूध भुकटी प्रकल्पासाठी दिलेला पाच कोटींचा अनुदान निधी अखेर या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर शासनाने परत घेण्याचा निर्णय घेतला.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...