agriculture news in Marathi, Opposition to the merger of Pune-Mulshi Market Committee | Agrowon

पुणे-मुळशी बाजार समितीच्या विलीनीकरणास अडत्यांचा विरोध

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा पुनर्रचना करण्यात आली असून, आता मुळशी बाजार समितीचे पुणे बाजार समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. या विलीनीकरणास श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने विरोध दर्शविला आहे. बाजार घटकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करतानाच, पुणे बाजार समितीच्या उत्पन्नातून मुळशी बाजार समितीच्या विकास करू नये, अशी मागणीदेखील असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली. 

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा पुनर्रचना करण्यात आली असून, आता मुळशी बाजार समितीचे पुणे बाजार समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. या विलीनीकरणास श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने विरोध दर्शविला आहे. बाजार घटकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करतानाच, पुणे बाजार समितीच्या उत्पन्नातून मुळशी बाजार समितीच्या विकास करू नये, अशी मागणीदेखील असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली. 

असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष राजेंद्र कोरपे, अमोल घुले, युवराज काची, सचिव रोहन उरसळ यावेळी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, ‘‘पुणे बाजार समिती नवीन बाजारासाठी दिवे येथे ४०० एकर जागा खरेदीसाठी पाठपुरावा करीत आहे. मग मुळशी बाजार समिती विलणीकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे. कार्यक्षेत्रात सतत बदल करून निवडणुका टाळल्या जातात. मागील १५ ते १६ वर्षांपासून पुणे बाजार समितीची निवडणक झालेली नाही.’’ 

दरम्यान बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले, ‘‘मुळशी बाजार आवारासाठी १०० एकर जमीन संपादित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे जमा आहेत. यातच आता नव्याने भूसंपादन प्रक्रिया राबवावी लागणार आहे. जमीन संपादनासाठी निधी उभारण्यासाठी बाजार समितीच्या १७० कोटींच्या ठेवीतून रक्कम देण्यात येईल’’, असेही देशमुख यांनी सांगितले.


इतर बातम्या
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...