Agriculture news in Marathi Opposition to naming Gorewada Zoo | Agrowon

गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नामकरणाला विरोध

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

गोरेवाडा उद्यानाला ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय’, असे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्राणिसंग्रहालयाचे उद्‍घाटन करणार आहेत.

नागपूर ः नागपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गोरेवाडा उद्यानाला ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय’, असे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला. येत्या मंगळवारी (ता. २६) म्हणजेच प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्राणिसंग्रहालयाचे उद्‍घाटन करणार आहेत. पण आता यावरून वाद पेटला आहे.

बाळासाहेब ठाकरे विदर्भविरोधी होते. वेगळा विदर्भ देण्यास त्यांचा विरोध होता. म्हणून विदर्भातील प्राणिसंग्रहालयाला विदर्भातील दुसऱ्या कोणत्याही नेत्याचे नाव दिले तरी चालेल. परंतु विदर्भविरोधी नेत्याचे नाव नको, अशी भूमिका घेत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे जीआर जाळून निषेध करण्यात आला. युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात गिरीपेठ येथील समितीच्या मुख्य कार्यालय परिसरात झालेल्या या आंदोलनाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपूरजवळ गोरेवाडा येथे साकारण्यात येत असलेल्या उद्यानात जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारीत असून, तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. जवळपास २ हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून, यामधील महत्त्वाची कामे वनविकास महामंडळ, नागपूर यांच्याकडून पूर्ण करण्यात आलेली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी काल दिली होती. आज विदर्भवाद्यांनी जीआर जाळला. त्यामुळे कार्यक्रमाच्या वेळीही विरोध प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा...
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूचम्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत...
मराठवाड्यात उपयुक्त पाणी ६५.८० टक्केचऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांतील उपयुक्त...
`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे...हिंगोली : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना...
अवकाळीच्या नुकसानीचे नांदेडमध्ये १८...नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी...
शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण...
साडेसात हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण...नांदेड : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘ई-फेरफार प्रणालीत नाशिक विभागाची बाजी’नाशिक : ‘‘महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीत...
भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्यांच्या समक्षच...भंडारा : जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र आणि सरासरी...
अकोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ....अकोला : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
महागाई विरोधात स्वाभिमानीचे लवकरच...कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने...
काजू खरेदी करताना आडकाठी केल्यास पोलिस...सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी-दोडामार्ग फळ बागायतदार...
‘म्हैसाळ’चे पाणी बंदिस्त पाइपद्वारे...सांगली ः जलसंपदा विभागाद्वारे म्हैसाळ योजनेच्या...
कायदा मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा...उत्तूर, जि. कोल्हापूर : आधी पुनर्वसन मग धरण हा...
‘शेतकरी सन्मान’च्या कामांना आता...औरंगाबाद : येत्या ८ मार्चपासून पंतप्रधान शेतकरी...
मार्च महिन्याची सुरुवातच अकोलेकरांसाठी...अकोला : मार्च महिन्याला सुरुवात होताच यंदाचा...
पंतप्रधानांची शेतकऱ्यांसाठी ‘बुक...नाशिक : देशात मागील काही महिन्यांपासून कृषी...
योजनेत गोंधळ झाल्यास ‘महसूल’ जबाबदार...पुणे : ‘‘कृषी खात्यात आम्ही राबतो व श्रेय महसूल...
ताकारी उपसा सिंचन योजनेचे फक्त आठच पंप...सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन १२...
वाशीममध्ये उन्हाळी पिकांच्या लागवडीकडे...वाशीमः या वर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने...