Agriculture news in Marathi Opposition to sale of lemons only in certain places in Pune | Agrowon

पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला विरोध

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने लिंबाची विक्री ही फक्त फळबाजारातच करण्याच्या आदेशाला शेतकरी, आडते आणि आडते असोसिएशनने विरोध केला आहे

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने लिंबाची विक्री ही फक्त फळबाजारातच करण्याच्या आदेशाला शेतकरी, आडते आणि आडते असोसिएशनने विरोध केला आहे. विशिष्ट आडते संघटित होऊन, लिंबाचे दर पाडण्याचा धोका शेतकऱ्यांना वाटत असून, सध्याची लिंबे विक्रीची विकेंद्री पद्धतीत स्पर्धात्मक दर मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र,केवळ काही मोजक्या आडत्यांनी एजंटद्वारे नवीन प्रशासकांना चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करून आदेश काढण्यात आल्याची चर्चा आहे. या निर्णया विरोधात आडते असोसिएशन प्रशासकांना वस्तुस्थितीची जाणीव करून देणार आहे.   

बाजार समितीमध्ये वर्षानुवर्षे लिंबाची विक्री फळ आणि भाजीपाला विभागात सुरू आहे. मात्र, काही मोजक्या आडत्यांनी संघटितपणे आपल्याच गाळ्यावर लिंबाची विक्री व्हावी यासाठी एका एजंटाद्वारे प्रशासकांची भेट घेतली. यावेळी नव्याने पदभार घेतलेल्या आणि बाजार आवारासह बाजार व्यवस्थांची अपुरी माहिती असलेल्या प्रशासकांना संभ्रम निर्माण होणारी माहिती देत फक्त फळबाजारात लिंबे विक्रीचा आदेश काढण्यास भाग पाडले. मात्र, या निर्णयाला आडते असोसिएशन आणि इतर लिंबे विक्रेते आडतदारांनी विरोध
केला आहे. भाजीपाला विभागातील अनेक आडते लिंबाचा व्यवसाय करतात, तर बाजार समिती स्थापनेपासून लिंबे केवळ फळ विभागातच विक्री व्हावी असा कोणताही कायदा आणि नियम नसताना केवळ काही निवडक आडत्यांसाठी हा निर्णय का घेतला या बाबत बाजार घटकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

याबाबत भाजीपाला विभागातील लिंबाचे आडते विलास निलंगे म्हणाले, ‘‘माझ्यासह अनेकांच्या आडतीवर लिंबाची विक्री होते. यामुळे शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळत आहे. मात्र फळ विभागात शेजारी शेजारी असणाऱ्या केवळ चार लिंबे आडत्यांनी आमच्याच आडतीवर माल यावा या उद्देशाने एका एजंटच्या माध्यमातून प्रशासकांना केवळ फळ विभागातच लिंबे विक्रीचा आदेश काढण्यात आला. हा दुर्देवी आहे. याबाबत आम्ही विभागप्रमुखांकडे तक्रार केली आहे. ’’

माझी १ हजार लिंबाची झाडे असून, सध्या दिवसाआड २५ ते ३० डाग माल सुरू आहे. लिंबे मी भाजीपाला विभागातील पाच सहा विविध आडतीवर विक्री करतो. मात्र, आता बाजार समितीने केवळ फळ विभागातच लिंबे विक्रीची केलेली सक्ती अन्यायकारक आहे. यामुळे दोन चार आडतीवर सगळा माल गेला आणि लिलावाला दुपार झाली तर लिंबाचे दर निम्म्याने कमी होतात. तर एकाच ठिकाणी दोन चार आडते असले की ते संघटीतपणे दर पाडण्याचा धोका आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान आहे. तरी पारंपरिक पद्धतीने भाजीपाला विभागातील आडतीवर देखील लिंबाच्या विक्रीची परवानगी हवी.’’
- बापू पडवळकर, लिंबू उत्पादक शेतकरी, चिलोडी. ता. कर्जत. जि.नगर


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...