Agriculture news in marathi Opposition to transfers in the Department of Agriculture | Agrowon

कृषी विभागात बदल्यांना विरोध 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

कृषी आयुक्तालयाने राज्यातील बदलीपात्र कृषी अधिकाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. दुसऱ्या बाजूला, कोरोनाचा फैलाव सुरू असल्याने प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात, अशी जोरदार मागणी कृषिसेवा महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद पोकळे यांनी केली आहे.

पुणे ः कृषी आयुक्तालयाने राज्यातील बदलीपात्र कृषी अधिकाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. दुसऱ्या बाजूला, कोरोनाचा फैलाव सुरू असल्याने प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात, अशी जोरदार मागणी कृषिसेवा महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद पोकळे यांनी केली आहे. 

कृषी खात्याचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी कृषी आयुक्त धीरज कुमार यांना पाठवलेल्या एका पत्रात बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याबाबत सूचित केले आहे. 
अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) संवर्गातील १४ अधिकारी, ५१ कृषी उपसंचालक व कृषी सेवा गट ब संवर्गातील ३५ अधिकारी सध्या बदलीस पात्र ठरत आहेत. 

राज्य शासनाच्या नियमानुसार तीन वर्षांनंतर अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतो. मेअखेर बदल्यांची घोषणा करावी लागते. यापूर्वी २०१८ मध्ये बदल्यांची यादी तत्कालिक कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे गेली होती. मात्र ३१ मे २०१८ रोजी त्यांचे अकस्मिक निधन झाल्याने बदल्या रखडल्या होत्या. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने जून २०१८ मध्ये बदल्या केल्या. 

शासनाच्या म्हणण्यानुसार, बदल्यांचे आदेश तीन वर्षांपूर्वी उशिरा निघाले होते. असे असले तरी संबंधित सर्व अधिकारी आता बदल्यांना पात्र ठरत आहेत. अशंतः बदली होऊन गेलेले, पदोन्नती मिळालेले, मुदतवाढ मिळालेले अधिकारी वगळता अद्यापही त्याच पदावर कामे करणारे अधिकारी बदलीस पात्र आहेत. त्यांची नावे कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. 

कृषी आयुक्त याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाने कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून बदल्यांना विरोध केला आहे. कोरोना साथीचा फैलाव व जवळ आलेला खरीप विचारात घेता यंदा प्रशाकीय बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी महासंघाने केली आहे. 

“क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी देखील कोविडचे बळी ठरत आहेत. असंख्य कर्मचारी गृह विलगीकरणात, तर काही इस्पितळात दाखल झालेले आहेत. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडत आहे. अशा स्थितीत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोविड नियंत्रणाचे कामकाजाची जबाबदारी सोपवू नये,” अशी देखील मागणी महासंघाचे अध्यक्ष पोकळे, सरचिटणीस प्रमोद वानखेडकर व कोशाध्यक्ष सोमनाथ माचकर यांनी केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
विमा कंपन्यांना आयुक्तांचा दणका पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत...