agriculture news in marathi Opposition uproars on Farm bill and farmers agitation against farm laws | Page 3 ||| Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली; काॅंग्रेसकडून निदर्शने

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 जुलै 2021

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी गुरुवारपासून जंतर-मंतरवर आंदोलनानंतर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ करून कामकाज बंद पाडले. 

नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी गुरुवारपासून जंतर-मंतरवर आंदोलनानंतर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ करून कामकाज बंद पाडले. 

आतापर्यंत दिल्लीच्या सीमेवर होणारे शेतकऱ्यांचे आंदोलन आता संसदेपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर येऊन पोहोचले आहे. केंद्र सरकारचे सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील सात महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा असून, राष्ट्रपतींना निवेदन देण्यापासून ते संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यापर्यंतची ग्वाही विरोधी पक्षांनी शेतकरी संघटनांना दिली आहे. 
त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी कृषी कायद्यांविरोधात लोकसभेमध्ये स्थगन प्रस्ताव दिला होता. तर आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनीही स्थगन प्रस्ताव मांडला होता. तर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी पेगॅसस प्रकरणात चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला होता. 

राज्यसभेमध्येही अशाच प्रकारच्या गोंधळाची पुनरावृत्ती झाली. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या जोरदार घोषणाबाजीमध्ये अत्यावशक संरक्षण सेवा आणि आंतरदेशीय नौकावाहतूक विधेयक मांडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत लोकसभेचे कामकाज पुन्हा दुपारी दोनपर्यंत तहकूब करावे लागले. सकाळी अकराला कामकाज सुरू होताच काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गोंधळातच प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. मात्र ‘काळे कायदे रद्द करा’ अशा घोषणा देत काँग्रेस खासदारांनी कामकाजात अडथळे आणले.

तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अन्नदात्याचा अपमान बंद करा, असे घोषणा फलकही विरोधकांनी या वेळी सभागृहात झळकावले. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करूनही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने अखेर त्यांनी दुपारी बारापर्यंत कामकाज तहकूब केले.

राहुल गांधींच्या नेतृत्वात हल्लाबोल
सभागृह सुरू होण्याआधी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमधील खासदारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर कृषी कायद्यांविरोधात निदर्शने केली. शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत, असा मागणी फलक झळकावता काँग्रेस खासदारांनी या वेळी ‘नरेंद्र मोदी, किसान विरोधी’ अशी जोरदार घोषणाबाजीही केली. याचे पडसाद दोन्ही सभागृहांमध्ये उमटले.


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...