कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
ताज्या घडामोडी
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्टरवरील संत्रा पिकाला फटका
वर्धा ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे संत्रा पिकात फळगळ होत असल्याने संत्रा उत्पादकांचे लक्ष शासकीय मदतीकडे लागले आहेत. जिल्हयातील सुमारे ६०० हेक्टरवरील संत्रा बागांमध्ये फळगळ झाल्याची नोंद कृषी विभागाने प्राथमिक अहवालात केली आहे.
वर्धा ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे संत्रा पिकात फळगळ होत असल्याने संत्रा उत्पादकांचे लक्ष शासकीय मदतीकडे लागले आहेत. जिल्हयातील सुमारे ६०० हेक्टरवरील संत्रा बागांमध्ये फळगळ झाल्याची नोंद कृषी विभागाने प्राथमिक अहवालात केली आहे.
जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा (घाडगे) परिसरात संत्रा लागवड आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन, कपाशी तसेच संत्रा या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संत्रा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यातूनच फळगळही झाली. शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या नंतर कृषी विभागाकडून नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानुसार प्राथमिक अहवालात ६०० हेक्टरवरील संत्रा पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
फळगळ संदर्भातील हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतू अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत नुकसानग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाकडून भरीव मदत जाहीर होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. शासनाने संत्रा पिकाच्या नुकसानभरपाईसाठी नैसर्गिक आपत्तीचे नियम लावल्यास संत्रा उत्पादकांना हेक्टरी १८ हजार रुपये मिळतील, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. समुद्रपूर तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टरवरील संत्रा पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज असून कृषी विभागाकडून सध्या युद्ध पातळीवर सर्वेक्षण केले जात आहे. आठ तालुक्यांपैकी हे सर्वाधिक नुकसान असल्याचेही समोर आले आहे.
- 1 of 586
- ››