agriculture news in marathi, orange crop on saline due to drought | Agrowon

संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

अमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने आणि संरक्षित जलस्राेतदेखील कोरडे पडले आहेत. फळबाग जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर ७०० रुपयांत टॅंकर खरेदी करून ओलित करण्याची वेळ आली आहे. 

अमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने आणि संरक्षित जलस्राेतदेखील कोरडे पडले आहेत. फळबाग जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर ७०० रुपयांत टॅंकर खरेदी करून ओलित करण्याची वेळ आली आहे. 

यावर्षी पावसाळा कमी झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी घटली. अशातच विहिरी व बोअरवेलने तळ गाठला. पाण्याअभावी संत्रा झाडावर असलेला मृगबहार शेतकऱ्यांना तोडून फेकावा लागला. त्यामुळे वरुड तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. ज्या शेतकऱ्यांजवळ पाणी होते. त्यांच्यावर सुद्धा या महिन्यात टॅंकरने ओलित करण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी संत्राबागा सुकू लागल्या. संत्रापट्टयातील समस्यांची दखल घेत या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी होऊ लागली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व इतर जलस्राेतांनी देखील तळ गाठला आहे. परिणामी, बागा जगविण्यासाठी त्यांच्याकडून टॅंकरद्वारे पाणी आणले जात आहे. ७०० रुपये टॅंकर असे पैसे त्यासाठी चुकवावे लागत आहेत. 

संत्रा झाडे जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याने तळ गाठल्याने आता टॅंकरने पाणी आणून संत्रा बागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहोत. ७०० रुपये टॅंकर असे दर आहेत. परंतु, बागेवर अशाप्रकारे किती खर्च होईल. याची माहिती नाही; परिणामी शासनाने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
- विजय अलोने, संत्रा उत्पादक, बेनोडा, ता. वरुड

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...