Orange cultivation in Shirpur Jain area
Orange cultivation in Shirpur Jain area

शिरपूर जैन भागात संत्रा लागवडीकडे कल

शिरपूर जैन व परिसरामध्ये यावर्षी संत्रा फळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे. यंदा या परिसरात जवळपास शंभर हेक्टरवर शेतकऱ्यांनी संत्रा रोपांची लागवड केली आहे.

शिरपूर जैन, जि. वाशीम ः शिरपूर जैन व परिसरामध्ये यावर्षी संत्रा फळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे. यंदा या परिसरात जवळपास शंभर हेक्टरवर शेतकऱ्यांनी संत्रा रोपांची लागवड केली आहे.

या भागात मागील वर्षी परतीचा पाऊस जोरात बरसला होता. यावर्षी आत्तापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. पर्जन्यमान समाधानकारक असल्यामुळे शेतकऱ्यांचा संत्रा फळबाग लागवडीकडे कल वाढताना दिसत आहे. शिरपूरपासून जवळच मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी पुरवठा मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून संत्र्यास चांगला बाजार भाव मिळत असल्याने या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी संत्रा लागवड सुरू केली आहे.

वाशीम जिल्हा हा सोयाबीन उत्पादनासाठी अग्रेसर समजला जातो. परंतु दिवसेंदिवस कोरडवाहू शेती शेतकऱ्यांना आता परवडणारी राहिलेली नाही. शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, मजुरी महागली आहे. शिवाय बाजार भावाची कोणतीही हमी नसल्यामुळे  शेतकरी मेटाकुटीस आला आहे. इतर हंगामी पिकामध्ये शेतकऱ्यांना फारशा उत्पन्नाची हमी नसल्याने शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळताना दिसत आहे. यावर्षी शिरपूर येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला संत्रा हैदराबाद सारख्या मोठ्या बाजारामध्ये नेऊन त्याठिकाणी कोल्ड हाऊसमध्ये ठेवून नंतर त्या मालाची विक्री केली आहे. यामुळे चांगला दर मिळवला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com