कोरोनामुळे संत्र्यातील ‘व्हिटॅमिन सी’चा झाला जागर

‘कोरोना’चा प्रभाव बाजारात काहीअंशी आहे. दरवर्षी ऊन तापण्यास सुरुवात झाली की संत्र्याला मागणी वाढते, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळेच साधारण प्रतीच्या संत्र्याचे दर सुरुवातीच्या १२ हजार रुपये टनावरुन १९ ते २१ हजारांवर पोचले आहे. मोठ्या आकाराच्या फळाचे दर २९ ते ३० हजार रुपये टनापर्यंत आहेत. - नीलेश रोडे, संचालक, नव्या संत्रा प्रोसेसिंग प्रकल्प, सालबर्डी, मोर्शी, अमरावती
nagpur-orange
nagpur-orange

नागपूर : तापमान वाढीस लागल्यानंतर दरात सुधारणा होतेच; मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पाश्‍‍र्वभूमीवर संत्र्यातील ‘व्हिटॅमीन सी’चा आरोग्यवर्धक म्हणून जागर झाल्याचा काहीसा परिणाम दर सुधारण्यावरही झाल्याची माहिती समोर आली. परिणामी काही दिवसांपूर्वी १२ हजार रुपये टन असलेल्या मोठ्या आकाराच्या संत्रा फळाचे दर २९ ते ३० हजार रुपये टनांवर पोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव चिकन खाल्ल्याने होतो, या अफवेने पोल्ट्री उत्पादकांचे प्रचंड नुकसान केले. मात्र, संत्र्यामध्ये ‘व्हिटॅमीन सी’ सर्वाधिक आहे. कोरोनाची धास्ती घेतलेल्या अनेकांकडून त्यामुळेच संत्रा आरोग्यदायी कसा आहे आणि सेवनावर भर दिल्यास काय फायदा होतो, याविषयी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असल्याने संत्र्याला मागणी वाढल्याचा दावा होत आहे; परंतु प्रक्रिया उद्योजकांनी मात्र प्रामुख्याने ऊन तापण्यास सुरुवात झाल्यानंतर दरवर्षी मागणी वाढून दरात तेजी येते, असे सांगण्यात आले.  पंजाबमधील किन्नोचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा राहतो. त्यामुळे बाजारात संत्र्याशिवाय इतर पर्यायी फळ नाही. त्यामुळेदेखील संत्र्याचा उठाव वाढला आहे. गेल्या वर्षी पाण्याअभावी विदर्भात ३० टक्‍के संत्राबागा वाळल्या होत्या. त्यासोबतच उत्पादकतेवरही मोठा परिणाम झाला. या वर्षीच्या मृग बहारात संत्र्याला वातावरण पोषक मिळाले. त्यामुळे साडेतीन ते चार लाख टनाचे उत्पादन झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कारण काही असले तरी मागणी वाढून उत्पादकांना वाढीव दर मिळत असल्याची बाब निश्‍चितच समाधान देणारी ठरत आहे.  प्रतिक्रिया संत्र्याचे उत्पादन या वर्षी साडेतीन लाख टनांपर्यंत गेले आहे; परंतु मागणी नसल्याने दर १२ हजारांपर्यंत खाली आले. आता कोरोनामुळे मागणी वाढून दर तीस हजार रुपये टनापर्यंत पोचले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही निश्‍चितच दिलासादायक बाब आहे.  - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com