‘कोरोना’ आणि पावसामुळे संत्रा झाडालाच 

शेलगाव, जि. वाशीम : वाशीम तालुक्यातील शेलगाव घुगे येथील जांभरून परिसरात असलेल्या आघाव कुटुंबियांची ७००झाडांची संत्रा बाग आहे. फळबागेचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. होळीनंतर ऐन बहरात असलेली संत्रा बाग ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे बागेला खरेदीदार न मिळाल्याने आणि याच दरम्यान पूर्वमोसमी पावसाने थैमान घालल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्या गेला आहे.
the orange dont sell just because of the rain and 'Corona'
the orange dont sell just because of the rain and 'Corona'

शेलगाव, जि. वाशीम : वाशीम तालुक्यातील शेलगाव घुगे येथील जांभरून परिसरात असलेल्या आघाव कुटुंबियांची ७०० झाडांची संत्रा बाग आहे. फळबागेचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. होळीनंतर ऐन बहरात असलेली संत्रा बाग ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे बागेला खरेदीदार न मिळाल्याने आणि याच दरम्यान पूर्वमोसमी पावसाने थैमान घालल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्या गेला आहे. 

आघाव कुटुंबाने व्यवस्थापनावर केलेला खर्चही निघाला नाही.  ‘कोरोना’वर उपाययोजना म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली. यामुळे वाहतूक व्यवस्था बंद झाली. मालवाहतूक होत नसल्याने व मालाचा उठाव नसल्याने व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवली. परिणामी झाडांवर लगडलेली फळे तशी परिपक्व होऊन गळू लागली. 

काही फळे झाडावरच सडली. लॉकडाऊन झाल्यापासून खरेदीदार बागेकडे फिरकलेले नाहीत. सोबतच पूर्वमोसमी पाऊसही येत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतमालक किसन आघाव, रामेश्वर आघाव, गजानन आघाव यांनी प्रशासनाने लक्ष देऊन मदत द्यावी. तसेच या भागात संत्रा साठवणूक केंद्र उभारण्याची मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com