दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
बाजारभाव बातम्या
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार रुपयांचा उच्चांकी दर
बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच गुरुवारी (ता.७) कळमणा बाजार समितीत अमित सोनटक्के यांच्या संत्र्याला उच्चांकी २२ हजार रुपये प्रती टनाचा दर मिळाल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला
नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच गुरुवारी (ता.७) कळमणा बाजार समितीत अमित सोनटक्के यांच्या संत्र्याला उच्चांकी २२ हजार रुपये प्रती टनाचा दर मिळाल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला. बाजारात आंबिया बहारातील हंगामापासून संत्र्याचे व्यवहार अवघ्या ९ ते १२ हजार रुपये प्रती टनाने होत आहेत.
हिंगणा तालुक्यातील वडगाव बक्षीचे रहिवासी असलेल्या अमित सोनटक्के यांची १४ एकरावर संत्र्यांची दीड हजार झाडे आहेत. या क्षेत्रातून मृग बहारातीलच संत्रा उत्पादन ते घेतात. या बहरातील फळे जानेवारी महिन्यात काढणीस येतात. हा बहार घेण्याकरिता तंत्रशुद्ध व्यवस्थापन ते करतात. दरम्यान त्यांच्या बागेतील काही झाडांवर आंबिया बहारातील फळांचीधारणा झाली. ही फळे काढून त्याची विक्री केली जाते.
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात दोन टन अशाप्रकारचा संत्रा त्यांनी विकला. त्यावेळी प्रती टन दहा हजार रुपये इतका अत्यल्प दर मिळाला. त्यानंतर गुरुवारी त्यांनी आंबिया बहारातील फळे विक्रीसाठी नेली. या फळांची साल टणक असल्याने व्यापाऱ्यांकडून उच्चांकी २२ हजार रुपयांचा दर देण्यात आला. त्यामुळे अमित सोनटक्के यांना सुखद धक्का बसला. सद्या आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने संत्रा आवक ९०० टनावर पोचली आहे.
प्रतिक्रिया...
मृग बहाराच्या संत्र्याचे व्यवस्थापन करताना बागेतील आंबिया बहारातील फळे काढावी लागतात. आजवर चार टन अशाप्रकारची फळे काढण्यात आली. सुरवातीला विकली त्यावेळी दोन टनाला वीस हजार रुपये इतकाचा दर मिळाला. गुरुवारी विक्रीच्यावेळी २ टनाला ४४ हजार रुपये इतका उच्चांकी दर व्यापाऱ्यांनी दिला.
- अमित सोनटक्के,
वडगाव बक्षी, ता. हिंगणा, जि. नागपूर
- 1 of 67
- ››