Agriculture news in marathi Orange import duty case Will discuss with Bangladesh | Agrowon

संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी चर्चा करणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

 संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने आयात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संत्रा निर्यात प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त करीत या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे.

अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने आयात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संत्रा निर्यात प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त करीत या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी या संदर्भाने गेल्या दोन दिवसांपूर्वीच खासदार रामदास तडस यांना निवेदन देत केंद्र सरकारने हस्तक्षेपाची मागणी या प्रकरणी केली होती. अमरावती जिल्ह्यात सुमारे दीड लाख मेट्रिक टन संत्रा उत्पादन होते. यापैकी सर्वाधिक ७८ हजार मेट्रिक टन संत्रा निर्यात एकट्या बांगलादेशला केली जाते.

मात्र बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे संत्रा निर्यातदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आयात शुल्क वाढीचा फटका शेतकऱ्यांना देखील बसणार आहे. देशांतर्गतच संत्रा प्रक्रिया विक्री करावी लागेल. त्यामुळे दर पडतील, अशी भीती आहे. परिणामी केंद्र सरकारने या संदर्भाने मध्यस्थी करून बांगलादेशला आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय वाणिज्य व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. बांगलादेश सरकारशी या संदर्भात चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीचा केंद्र सरकार सहानुभूतिपूर्वक विचार करणार असून, बांगलादेश सरकारशी या संदर्भाने चर्चा केली करून परस्पर सहकार्यातून हा प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री गोयल यांनी दिल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...