नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
अॅग्रो विशेष
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव नसल्याने उत्पादक हवालदिल
अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती लागली असतानाच भाव पडल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या वर्षी कमी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या संत्रा बागा पाण्याअभावी सुकल्या होत्या. पर्यायाने काहींनी बागा तोडल्यासुद्धा. ज्यांच्याकडे थोडीफार ओलिताची सोय होती त्यांनी जिवाचे रान करून आपल्या बागा जगविल्या. काही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये आंबिया बहार धरलासुद्धा. मात्र यावर्षी पावसामुळे सतत ओलावा असल्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे आंबिया बहाराला गळती लागली आहे. येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे.

फळगळती वाढलेली असतानाच व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूकसुद्धा होताना दिसत आहे. सुरुवातीला चारशे ते पाचशे रुपये प्रति २० किलो क्रेटची मागणी होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आता दीडशे ते दोनशे रुपयांवर हे दर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच मुस्कटदाबी होत आहे.
या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी मागील काही वर्षापासून सातत्याने अडचणीत येत आहेत. कधी पाऊस कमी झाल्याने, तर कधी जास्त झाल्याने तो कोंडीत सापडत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंबिया आणि मृग असा दोन्ही प्रकारच्या बहार आहे. त्यापासून मुबलक प्रमाणात पैसे मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना मात्र भाव पडल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.