मोहपा परिसरात संत्रागळ  ९० टक्क्यांपेक्षा अधिक 

नागपूर परिसरातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या संत्रागळीमुळे हवालदिल झाले आहेत. याकडे शासनाने, कृषी विभागाने व एनआरसीसीने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
Orange in Mohpa area  More than 90 percent
Orange in Mohpa area More than 90 percent

मोहपा, जि. नागपूर : नागपूर परिसरातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या संत्रागळीमुळे हवालदिल झाले आहेत. याकडे शासनाने, कृषी विभागाने व एनआरसीसीने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.  अतिवृष्टी, पुरेशा प्रमाणात सूर्याप्रकाशाचा अभाव व बुरशीजन्या रोगाचा प्रादुर्भाव या कारणांमुळे प्रत्येक संत्रा बागायतदाराच्या मालाची पन्नास टक्के गळ झालेली आहे. होत असलेल्या संत्रागळीवर कुठल्याही उपाययोजना किंवा मार्गदर्शक कार्यक्रम कृषी विभागाने राबाविला नाही, की कुठलेही सर्वेक्षण केले नाही. एका तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या मते कोलेटोट्रीकम, ब्राऊन रॉट, फायटोप्थोरा आदी रोगांच्या समस्या भेडसावत आहेत. बुरशीनाशकांची फवारणी करूनही गळ कायमच आहे. रोगांची लागण झाल्यामुळे व संत्रागळ सुरू असल्यामुळे संत्र्याची गुणवत्ता व टिकाऊपणा कमी झालेला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पण पाठ फिरवली आहे. आंबिया पिकामुळे शेतकऱ्यांची दिवाळी साजरी व्हायची, पण निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिवाळी अंधारात गेली आहे. अनेक संत्रा बागायतदार आता भाजीपाल्याचे दुकाने बाजारात लावताना दिसत आहेत. शासनाने संत्रा बागेचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संत्रा बागायतदार करीत आहे. 

प्रतिक्रिया  जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र संत्रा बागेने व्यापलेले आहे. या वर्षी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त संत्रा पिकाची नैसर्गिक गळ होत असताना कृषी विभागाद्वारे अजून सर्वेक्षण झालेले नाही, तर नुकसानभरपाई कशी मिळेल? शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन का आहे?  - राजू धनराज निमकर, शेतकरी, बुधला   

या क्षेत्रात ६० ते ७० टक्के संत्रा बागायतदार असून, येणाऱ्या वर्षाचे आर्थिक नियोजन संत्रा पिकावरच अवलंबून आहे. या वर्षीची परिस्थिती बघता संत्रा बागायतदार कसा सावरेल, ही विचार करायला लावणारी बाब आहे.  - सेवाराम कऊटकर, म्हसेपठार, शेतकरी   

होणाऱ्या संत्रा गळतीवर अनेक महागड्या फवारण्या केल्या, पण गळ आटोक्यात आली नाही. शासनाकडून या बाबत कुठलेही मार्गदर्शक कार्यक्रम राबविण्यात आलेले नाही.  -अनिल ठोंबरे, शेतकरी, मांडवी   

मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. कृषिप्रधान देशात शेतकरीच हलाखीच्या परिस्थितीत असणे लाजिरवणी बाब आहे.  -प्रशांत कापसे, उपसरपंच, पिपळा किनखेडे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com