agriculture news in marathi Orange prices are unlikely to rise | Agrowon

संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये दराने

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरात तेजीची शक्यता तूर्त नाही. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांचे व्यवहार या आठवड्यात मात्र अवघ्या ११०० ते १४०० रुपये दराने होत आहेत.

नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची शक्यता मावळली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला १६०० ते १९०० रुपये क्विंटल असलेल्या मोठ्या आकाराच्या संत्रा फळांचे व्यवहार या आठवड्यात मात्र अवघ्या ११०० ते १४०० रुपये दराने होत आहेत, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

कळमना बाजार समितीत गेल्या आठवड्यात संत्र्यांची आवक सात हजार क्विंटलवर पोचली. टप्प्याटप्प्याने ती १००० क्विंटल अशी कमी होत या आठवड्यात पुन्हा आवक पाच हजार क्विंटलपर्यंत पोचली. संत्रा दरही कमी-जास्त होत आहेत. १६०० ते १९०० रुपयांवरून दर ११०० ते १४०० रुपयांपर्यंत खाली आले. बाजारात मोसंबीची देखील आवक नियमित आहे. मोसंबीची आवक गेल्या आठवड्यात एक हजार क्विंटल होती. या आठवड्यात ही अवघ्या दोनशे क्विंटलवर आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  

मोसंबीचे दर गेल्या आठवड्यात ३७०० ते ४३०० रुपये होते. या आठवड्यात हे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मोसंबीची आवक कमी असल्याने काही अंशी दरात तेजी आली आहे. बाजारात गव्हाची ४०० क्विंटल आवक आहे. दर १६०० ते १८०० रुपये क्विंटल होते. तांदळाचे दर २५०० ते २७०० रुपये आहे. आवक अवघी २१ क्विंटलची आहे. 

बाजारात हरभऱ्याच्या आवकेत मोठे चढ-उतार आहेत. गेल्या आठवड्यात हरभऱ्याची १२५ क्विंटल आवक झाली. या आठवड्यात अवघी ७२ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. हरभरा दर गेल्या आठवड्यात ४६०० ते पाच हजार रुपये क्विंटल होते. या आठवड्यात हरभरा दर ४१५० ४८०० रुपये दरम्यान राहिले. 

तुरीची आवक गेल्या आठवड्यात तीन क्विंटल होती. या आठवड्यात ती ७२ क्विंटलवर पोहोचली. दर ५४०० ते ६००० रुपये आहेत. उडदाची सहा क्विंटल आवक, तर दर ६००० ते ६२०० रुपये होते. भुईमूग शेंगांची आवक दहा क्विंटल इतकी अत्यल्प होती.  शेंगांचा दर ४००० ते ४५०० असा स्थिर आहे. सोयाबीनचे दर ३७०० ते ४४१० असून आवक सरासरी एक हजार क्विंटलची आहे. 

बटाट्याला ३५०० ते ४००० रुपये दर मिळाला. आवक २५०० क्विंटल आहे. कांदा दर ५००० ते सहा हजार रुपये क्विंटल असून आवक ६०० क्विंटलची आहे. लसणाची आवक ५०४ क्विंटलची झाली. ६००० ते १०५०० रुपये दर आहे. आले आवक १७८४ क्विंटल असून दर २३०० ते २५०० रुपये असे होते. वाळलेल्या मिरचीची आवक ३१६  क्विंटल आहे. ८००० ते १५००० रुपये दर होता. 

टोमॅटोला क्विंटलला १४०० ते १५०० रुपये  

दर मिळाला. टोमॅटो आवक १००  क्विंटलची होती. चवळी शेंगांना ४०० ते पाचशे रुपये क्विंटल असा दर मिळाला. शेंगांची आवक अवघी २०  क्विंटल होती. भेंडीचे व्यवहार ७०० ते ८०० रुपये क्विंटलने झाले. आवक जेमतेम ३० क्विंटल होती. गवार शेंगांना १५०० ते १६०० रुपये दर आणि आवक २० क्विंटल. हिरवी मिरची १५०० ते १६०० रुपये क्विंटल आणि आवक ४० क्विंटलची होती


इतर बाजारभाव बातम्या
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली...
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात हिरव्या मिरचीच्या दरात वाढ पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळीदरात किंचित सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार केळीचा तुटवडा असतानाच...
नाशिक जिल्ह्यात कांदा दरात सुधारणानाशिक : कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे...