सेंट्रल बॅंकेविरोधात संत्रा उत्पादक शेतकरी करणार आंदोलन

सेंट्रल बॅंकेविरोधात संत्रा उत्पादक शेतकरी करणार आंदोलन
सेंट्रल बॅंकेविरोधात संत्रा उत्पादक शेतकरी करणार आंदोलन

अमरावती ः संत्रा पीकविम्याची रक्‍कम सेट्रंल बॅंक ऑफ इंडियाने कर्ज खात्यात वळती केली. अडचणीतील शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याचा आरोप करीत या विरोधात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  शेतकऱ्यांचा शासकीय अनुदानावरच भर कमी व्हावा त्यासोबतच पीक संरक्षणाचा उद्देश साधला जावा याकरिता पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्‍तीचा तर बिगर कर्जदारांसाठी पीकविमा ऐच्छिक आहे. प्रशासनाकडून हंगामात पीकविमाविषयक जागृती केली जाते. गेल्या हंगामात व्यापक जागृतीच्या परिणामी संत्रा उत्पादकांनी आपल्या बागेचा विमा उतरविला होता.  २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या या विम्याचा नियमानुसार हप्ताही भरण्यात आला. नुकसानीनंतर यातील बहुतांश शेतकरी २०१९ मध्ये विमाभरपाईस पात्र ठरले. सेट्रंल बॅंक ऑफ इंडियाच्या करजगाव शाखेने मात्र ही रक्‍कम शेतकऱ्यांच्या बचत ठेव खात्यात जमा न करता परस्पर कर्ज खात्यात वळती केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या बॅंकेतील ४०० पेक्षा अधिक शेतकरी पीकविमा भरपाई आणि कर्जमाफीपासूनही वंचित राहिले आहेत. काही शेतकऱ्यांकडून मात्र अर्ज घेत त्यांना पीकविम्याचा लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी पीकविम्याबाबत बॅंक प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याप्रकरणी गंभीरपणे चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्‍कम जमा न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकरी रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. या वेळी योगेश पवार, सुजीत फरकाडे, चेतन उमप, अतुल टाकरखेडे, संजय गणोरकर, महेंद्र निमकर, स्वप्निल सावरकर, दुर्योधन जवंजाळ, प्रवीण गणोरकर, विनोद उमप, हर्षद पवार, सरोज पवार हे संत्रा उत्पादक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com