agriculture news in Marathi orange producers came together for selling Maharashtra | Agrowon

शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार पुकारणाऱ्या चौसाळा गावातील शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन'च्या वृत्तानंतर राज्यभरातून बळ मिळाले.

अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार पुकारणाऱ्या चौसाळा गावातील शेतकऱ्यांना ‘ॲग्रोवन'च्या वृत्तानंतर राज्यभरातून बळ मिळाले. तब्बल २२ गावातील शेतकऱ्यांनी अशाप्रकारचे संघ स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात सहा गावांमध्ये अशा संघाची बांधणी होणार आहे. 

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा परिसरात संत्रा लागवड अधिक आहे उत्पादित संत्र्याची आपल्या अटींवर खरेदी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी जाहीर केला होता. याला गावातील युवा शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता चौसाळा संत्रा उत्पादक संघाची बांधणी करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून संत्रा उत्पादकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याकरिता चौसाळा सुरक्षा समितीचे ही गठण करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या अटीवर संत्रा विकला जाईल अशी भूमिका जाहीर केली. 

‘ॲग्रोवन''ने मंगळवारी (ता.२७) वृत्त प्रकाशित केले होते. व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे राज्यभरातून अनेकांनी समर्थन केले. तब्बल २२ गावातील शेतकऱ्यांनी आमच्या गावात अशा प्रकारचे संघ उभारणार असल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांच्या शोषणाविरोधातील या मोहिमेत चौसाळा गावातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा देखील या २२ गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भंडारज, दहीगाव, चिंचोना, निमखेड बाजार, खिराळा या गावांमध्ये संत्रा उत्पादक संघाची बांधणी केली जाणार आहे. 

गाव पातळीवरील या संघापासून पुढे महासंघाची देखील निर्मिती केली जाणार असल्याची माहिती हर्षद काळमेघ यांनी दिली. त्याकरिता संस्था नोंदणी कार्यालयात रीतसर नोंदणीही केली जाणार आहे. त्यादृष्टीने देखील तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या महासंघामध्ये संत्रा उत्पादक प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येईल, असेही हर्षद काळमेघ यांनी सांगितले. निमखेड बाजार आणि दहिगाव चे येथे त्याकरिता पहिल्या टप्प्यात बैठक पार पडली.

प्रतिक्रिया
गाव पातळीवर होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शोषणाविरोधात आम्ही दंड थोपटले. या मोहिमेला राज्यव्यापी ओळख आणि बळ ‘ॲग्रोवन’ने दिले. त्यामुळे यापुढील काळात संत्रा उत्पादकांचा महासंघ स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 
- हर्षद काळमेघ, सदस्य, संत्रा उत्पादक सुरक्षा समिती, चौसाळा, अमरावती.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...