धक्कादायक ! संत्रा उत्पादकांवर निवडताहेत बागा विकण्याचा पर्याय

माझ्याकडे २००० मोठी, तर १२०० लहान संत्रा झाडे आहेत. या वर्षी तापमानात झालेली वाढ आणि आटलेले जलस्रोत पाहता पाचनाल्यावरून पाणीउपसा करण्याकरिता २६ लाख रुपये खर्च करीत पाइपलाइन टाकली. परंतु, नादुरुस्त कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने पाणीच मिळाले नाही आणि हा खर्च वाया गेला. ४ पैकी २ कृषिपंप पाण्याअभावी बंद करावे लागले. विजेचा प्रश्‍न केवळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांमुळे गंभीर झाला आहे. ते आमच्या तक्रारींची दखल घेत नाहीत. - उत्तम ऊर्फ बाबूराव आलोडे, संत्रा बागायतदार, बेनोडा, जि. अमरावती.
संत्रा उत्पादक बागा विकण्याचा पर्याय निवडत आहेत
संत्रा उत्पादक बागा विकण्याचा पर्याय निवडत आहेत

अमरावती  ः पिकाला गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध होण्यास भेडसावणाऱ्या अडचणी, दिवसाऐवजी रात्री वीज मिळणे आदी कारणांमुळे संत्रा पट्ट्यातील शेतकरी त्रस्त आहेत. यातूनच काही शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे, तर काहींची संत्रा शेतीपासूनच फारकत घेण्याची मानसिकता झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बागा विकण्याचा पर्याय निवडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. नजीकच्या काळात मात्र सातत्याने खालावत जाणारी पाणीपातळी, पावसाची अनिश्चितता, त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने न भरणे अशा अनेक कारणांमुळे संत्रा शेतीसाठी पाणी उपलब्धतेच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.  कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या वरुड मतदारसंघात असलेल्या बेनोडा गावालगत पळसोना लघुसिंचन प्रकल्प आहे. ढवलगिरी नदी या प्रकल्पाजवळून वाहते. गेल्या पंधरा वर्षांत हा प्रकल्प एकदाच भरला. या प्रकल्पाची सिंचन क्षमता २५० हेक्‍टर दर्शविण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच असल्याचे शेतकरी सांगतात. या वर्षी तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात आली. जलस्रोतही झपाट्याने आटल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढत गेल्या.

संत्राबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी सारेच पर्याय अवलंबले. पाचनाला प्रकल्पाला पाणी असल्याने बेनोडा गावातील शेतकऱ्यांनी तब्बल १२ ते १५ किलोमीटर पाइपलाइन स्वखर्चाने टाकली. यावर २६ ते ३० लाखांवर खर्च झाला. त्याकरिता बॅंकेचे कर्ज काढले. परंतु, प्रशासनाने नादुरुस्त कालव्यातून पाणी सोडल्याने हा प्रकल्प एप्रिल महिन्यातच कोरडा पडला. त्यामुळे पाइपलाइनवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पाणी मिळाले नाही आणि कर्जाचा भार वाढला. हा भाग ड्राय झोन जाहीर केला असल्याने बोअर घेण्याचा पर्यायदेखील संपुष्टात आला होता. विहिरीचा पर्यायदेखील पाण्याअभावी उरला नव्हता. त्यामुळे चार हजार शेतकऱ्यांची यानुसार बेनोडा व लगतच्या शिवारात एक लाखावर संत्रा झाडे वाळल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आता या भागातील शेतकऱ्यांसमोर कर्जाच्या परतफेडीचे आव्हान उभे ठाकले आहे. यातूनच काही शेतकऱ्यांनी बागा विकण्याचा पर्याय निवडल्याचे बोलताना सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com