Agriculture news in Marathi Oranges to be exported to Bangladesh by rail | Agrowon

बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा निर्यात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा उत्पादक तसेच निर्यातदारांना कमी खर्चाचा आणि वेळेची बचत करणारा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. नागपुरी संत्र्याची बांगलादेशला सर्वाधिक निर्यात होते.

नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा उत्पादक तसेच निर्यातदारांना कमी खर्चाचा आणि वेळेची बचत करणारा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. नागपुरी संत्र्याची बांगलादेशला सर्वाधिक निर्यात होते. त्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे अधिकारी, निर्यातदारांनी बांगलादेश सीमेनजीकच्या स्थानकांची पाहणी केली. 

विदर्भात नागपूर संत्रा खालील सर्वाधिक क्षेत्र आहे. सुमारे एक लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा आहे. त्यापासून सुमारे सात लाख टन फळांचे उत्पादन होते. त्यातील सुमारे दीड लाख टन संत्र्याची बांगलादेशला निर्यात केली जाते. यापूर्वी संत्रा निर्यातीकरिता रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. यामध्ये बांगलादेशला संत्रा पोहोचण्यास बराच कालावधी लागतो. संत्र्यांची टिकवणक्षमता कमी असल्याने संत्रा खराब होण्याची देखील भीती राहते. त्यासोबतच रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून संत्रा निर्यात केल्यास प्रति टन ५००० रुपये इतका प्रचंड खर्च होतो. 

गेल्या वर्षीपासून किसान रेल्वेचा पर्याय शेतकरी व निर्यातदारांना उपलब्ध करून दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून किसान रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या शेतमाल वाहतुकीसाठी अनुदानदेखील उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शेतकरी व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला. परिणामी गेल्या वर्षीच्या हंगामात देशाअंतर्गत १८०० टन संत्रा वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून झाली. शालिमार तसेच आझादपूर मंडी दिल्लीमध्ये हा संत्रा पाठविण्यात आला होता. या वर्षीदेखील किसान रेल्वेचा पर्याय संत्रा वाहतूकदारांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याकरिता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वरुड येथे संत्रा निर्यातदार यांची बैठक घेतली. त्यामध्ये या वर्षीच्या हंगामात जास्तीत जास्त संत्रा देशातील बाजारपेठांसोबतच बांगलादेशला निर्यात व्हावा यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेश नजीकच्या बनगाव, जेडे, बेनापोल स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासोबतच कस्टम क्लीअरिंगसाठी असलेल्या टेट्रापोल भागालाही भेट देण्यात आली.

बनगाव रेल्वे स्टेशनचा पर्याय
शेतीमाल वाहतुकीकरिता भारतीय हद्दीपर्यंतच किसान रेल्वेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. गेल्या वर्षी बांगलादेशमधील बेनापोल स्थानकापर्यंत संत्रा वाहतूक करण्याचे प्रस्तावित होते. परंतु या ठिकाणी रेक खाली करण्याची सुविधा पर्याप्त नाही. त्यामुळे अन्य स्थानकांची चाचपणी केली जात होती. पश्‍चिम बंगालमधील बनगाव स्थानक हे बांगलादेशपासून अवघ्या सात किलोमीटर, तर जेडे स्थानक हे अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर आहे. यातील जेडे स्थानकावर संत्रा खाली करण्यासाठीच्या सुविधा पर्याप्त आहेत. त्यामुळे या स्थानकाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या ठिकाणी संत्रा पोहोचल्यानंतर तेथून ट्रकद्वारे बांगलादेशला पाठविण्यात येईल. रेल्वे अधिकारी व निर्यातदारांनी गुरुवारी (ता. २३) या भागात भेट दिली. स्थानकावरील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर लवकरच किसान रेल्वे सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या भारतीय हद्दीपर्यंत होणाऱ्या वाहतुकीसाठी किसान रेल्वेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. अनुदान बांगलादेश संत्रा निर्यात करणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना देण्यात आल्यास मोठा फायदा होणार आहे याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. 
- रमेश जिचकार, 
सचिव, इंडो-बांगला ऑरेंज एक्स्पोर्टर असोसिएशन
 


इतर बातम्या
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...
पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला...पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे...