Orchard cultivation on 335 hectares from MGNREGA
Orchard cultivation on 335 hectares from MGNREGA

‘मनरेगा’तून ३३५ हेक्टरवर फळबाग लागवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत सन २०२०-२१ मध्ये परभणी जिल्ह्यात ४३६ शेतकऱ्यांनी ३३५.८३ हेक्टरवर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या फळबाग लागवडीची ५१० कामे सुरू असून त्यावर ९०३ कामांवर आहेत. मजुरीवर ८७ लाख ९२ हजार ९५५ रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत सन २०२०-२१ मध्ये परभणी जिल्ह्यात ४३६ शेतकऱ्यांनी ३३५.८३ हेक्टरवर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या फळबाग लागवडीची ५१० कामे सुरू असून त्यावर ९०३ कामांवर आहेत. मजुरीवर ८७ लाख ९२ हजार ९५५ रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात कृषी सहायकांची एकूण कार्यरत पदे २६४ एवढी आहेत. सन २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मिळून एकूण ५८४ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील २ हजार ६९ लाभार्थी शेतकऱ्यांचे १ हजार ५१० हेक्टवर फळबाग लागवडीसाठी संमती अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ४१ लाभार्थ्यांना १ हजार ४९१.५२ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी तर २ हजार ७ शेतकऱ्यांना १ हजार ४५९ .७६ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

आजवर ४४८ शेतकऱ्यांनी ३४३.२३ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदले असून त्यापैकी ४३६ शेतकऱ्यांनी ३३५.८३ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. सध्या जिल्ह्यात फळबाग लागवडीची ५१० कामे सुरू असून त्यावर  ९०३ मजूर कामावर आहेत. मजुरीवर ८७ लाख ९२ हजार ९५५ रुपये खर्च झाला आहे.

यंदा जिल्ह्यात फळपीकनिहाय लागवडीमध्ये संत्र्याची १८६ शेतकऱ्यांनी १५४.४० हेक्टर लागवड केली आहे. मोसंबीची १६ शेतकऱ्यांनी १४.१० हेक्टरवर, लिंबाची ७६ शेतकऱ्यांनी ५४ हेक्टरवर, लिंबाची ७६ शेतकऱ्यांनी ५४ हेक्टरवर, पेरुची ६४ शेतकऱ्यांनी ४२ हेक्टरवर, सीताफळाची ५८ शेतकऱ्यांनी ४४.३ हेक्टरवर, चिकूची ६ शेतकऱ्यांनी ४.९० हेक्टरवर, आंब्याची ३० शेतकऱ्यांनी २२.२३ हेक्टवर लागवड केली आहे.

मानवत तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर तर सर्वात कमी क्षेत्रावर  सोनपेठ तालुक्यात लागवड झाली आहे. संत्रा फळपिकांचे क्षेत्र सर्वाधिक तर चिकूचे क्षेत्र सर्वात कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com