Agriculture news in Marathi Orchard cultivation on 471 hectares from MGNREGA | Agrowon

परभणीत ४७१ हेक्टरवर फळबाग लागवड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 मार्च 2021

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सन २०२०-२१ मध्ये परभणी जिल्ह्यात ६४६ शेतकऱ्यांनी ४७१.४८ हेक्टरवर विविध फळपिकांची लागवड केली आहे.

परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सन २०२०-२१ मध्ये परभणी जिल्ह्यात ६४६ शेतकऱ्यांनी ४७१.४८ हेक्टरवर विविध फळपिकांची लागवड केली आहे. फळबाग लागवडीच्या कामांवर १ कोटी ६६ लाख ७३ हजार रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मनरेगाअंतर्गत सन २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यात ५८४ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट होते. परंतु जिल्ह्यातील २ हजार ८७ शेतकऱ्यांचे १ हजार ५२०.८० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी संमती अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ६२ शेतकऱ्यांना १ हजार ५०४.८२ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी तर २ हजार २८ शेतकऱ्यांना १ हजार ४७६३.१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ६६५ शेतकऱ्यांनी ४८३.२८ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदले होते. परंतु त्यापैकी ६३६ शेतकऱ्यांनी ४७१.४८ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे.

या अंतर्गतच्या कामांवर १ कोटी ६६ लाख ७३ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे. यावर्षीच्या फळपीकनिहाय लागवड क्षेत्रात संत्र्यांची २४५ शेतकऱ्यांनी १९६.५० हेक्टर लागवड केली आहे. मोसंबीची २३ शेतकऱ्यांनी १९.४० हेक्टरवर, लिंबाची १०९ शेतकऱ्यांनी ७१.३१ हेक्टरवर, पेरूची १०८ शेतकऱ्यांनी ६७.६० हेक्टरवर, सीताफळाची ९१ शेतकऱ्यांनी ६५.९० हेक्टरवर, चिकूची १२ शेतकऱ्यांनी ९.९५ हेक्टरवर, आंब्याची ५६ शेतकऱ्यांनी ३९.०२ हेक्टरवर लागवड केली आहे.

डाळिंबाची २ शेतकऱ्यांनी १.८० हेक्टरवर लागवड केली आहे. मानवत तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर तर पालम तालुक्यात सर्वात कमी क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. संत्रा फळपिकांचे लागवड क्षेत्र सर्वाधिक तर डाळिंबाचे क्षेत्र सर्वात कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...