कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
फळबाग लागवडीसाठी निधी देणार : दादा भुसे
फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत २१७ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी १०३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेडनेट, मल्चिंग, कांदा चाळ उभारणी, अशी कामे करण्यात येत आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता १११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी ४२ कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत.
विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, या योजनेसाठी २ कोटी १७ लाख रुपये वितरित करण्यात आले असून, ५ कोटी ४१ लाख रुपये खर्चाची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहितीही भुसे यांनी दिली.
दरम्यान, कोकणात चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांसाठी विशेष बाब म्हणून शासनाने ६०९ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. कोरोना संकटाच्या काळातही शासनाने फळबाग लागवडीचे काम सुरूच ठेवले असून, येत्या वर्षभरात ५० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही माहितीही भुसे यांनी सांगितले.