कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
बातम्या
पेठ तालुक्यात फळबागा जमीनदोस्त
नाशिक : पेठ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान फळबागांचे झाले आहे.
नाशिक : पेठ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान फळबागांचे झाले आहे.
यात गावंधपाडा येथील प्रयोगशील शेतकरी यशवंत गवांदे यांच्या शेतातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुसान झाले आहे. गवांदे यांनी निवृत्तीनंतर आदिवासी पट्ट्यात फळबागा विकसित करून कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग साकारले आहेत. त्यांनी सघन पद्धतीने फळबाग लागवड केली होती. तीन वर्षांपासून जवळपास अडीच लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या बागेत या वर्षी पेरूच्या झाडांना बहर आला होता. मात्र, मुसळधार पावसाने शेतातील सर्व बांध फुटल्याने पेरू, आंबा, काजू, बदाम, जांभूळ, लिंबू आदी अनेक झाडे वाहून गेली. शिवाय काढणीसाठी आलेला पेरू गळून पडला.
यासह परिसरातील भात, नागलीसह टोमॅटो लागवडीचे नुकसान झाले. याबरोबर भोपळे, कारले यांचे मांडव जमीनदोस्त झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाईसाठी अहवाल सादर करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
- 1 of 914
- ››