परभणी जिल्ह्यात फळबागांची २३३ हेक्टरवरच लागवड
परभणी जिल्ह्यात फळबागांची २३३ हेक्टरवरच लागवड

परभणी जिल्ह्यात फळबागांची २३३ हेक्टरवरच लागवड

परभणी : जिल्ह्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत २०१९-२० च्या हंगामात फळबाग लागवडीस ९५५ शेतकऱ्यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. यांपैकी २१७ शेतकऱ्यांनी २३३.५० हेक्टरवर फळबाग लागवड केली. त्यावर ७० लाख ५ हजार रुपये निधी खर्च झाला, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

या योजनेअंतर्गत २०१९-२० या वर्षासाठी ४ कोटी २८ लाख ६२ हजार रुपये निधीची तरतूद आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील १५ हजार २३७ शेतकऱ्यांनी ३ हजार ३०५ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ३ हजार ३०५ शेतकऱ्यांना ३ हजार ९८ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी पूर्वसंमती देण्यात आली. ९८७ शेतकऱ्यांना ८९५.२० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मान्यता देण्यात आली.

आजवर २३३.५० हेक्टरवरील फळबागेसाठी ७० लाख ५ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अनेक मंडळांमध्ये अपुऱ्या पावसामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे फळबाग लागवड ठप्प झाली आहे.

फळबाग लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका शेतकरी संख्या  क्षेत्र
परभणी १७
जिंतूर २८ २८
सेलू  १९ २०
मानवत १३१ १४१
पाथरी
सोनपेठ १६ १५
गंगाखेड ६ 
पालम 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com