मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना फटका

आधी फारसे नुकसान झाले नाही. मात्र, गुरुवारी (ता. ४) रात्री आलेल्या वादळाने व्हत्याचे नव्हते केले. पाडाला येण्या आधीच ६० ते ७० टक्के आंबे गळून पडले. आता उरलेले टिकतील की नाही, ही भीती आहे. - मिठुभाऊ चव्हाण, आंबा उत्पादक, भांडेगाव, ता. खुलताबाद १२ ते १४ मे दरम्यान निसर्गाच्या दणक्याने ६० ते ७० टक्के आंबा गळाला होता. आता गुरुवारी रात्री आलेल्या वादळाने झाडावर एकही फळ राहिले नाही. विमा कंपनी आणि प्रशासन याची दखल घ्यायला तयार नाही. - गवनाजी अधाने, उत्पादक,विरमगाव, ता. फुलंब्री.
Orchards hit in five districts of Marathwada
Orchards hit in five districts of Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात या पाच जिल्ह्यातील १४६ मंडळांत पूर्व मोसमी पाऊस झाला. कुठे तुरळक कुठे हलका, तर कुठे मध्यम पाऊस झाला. त्याचा औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक जोर राहिला. वादळामुळे फळपिकांचे, त्यातही आंब्यांचे मोठे नुकसान झाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळांत पूर्व मोसमी पावसाची हजेरी लागली. बहुतांश ठिकाणी वादळासह आलेल्या या पावसाने जिल्ह्यातील केसर आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान केले. गंगापूर तालुक्यातील रायपूर येथे वादळामुळे विजेची तार तुटून पडल्याने त्यामधून लागलेल्या शॉकमुळे जवळपास २६ मेंढ्यांना जीव गमवावा लागला. ६५ मंडळांत १ ते ४४ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. 

औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४२ मंडळांत पावसाची हजेरी लागली. जवळपास १ ते ४९ मिलिमीटर दरम्यान या मंडळांमध्ये पाऊस झाला. जाफराबाद, भोकरदन तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर, मंठा तालुक्यात पावसाचा टिपूसही पडला नाही. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २३ मंडळांत एक ते अकरा मिलिमीटर दरम्यान तुरळक ते हलका पाऊस झाला.

शिरूर कासार, अंबाजोगाई, धारूर, परळी तालुक्यांत पावसाचा थेंबही पडला नाही. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी केवळ ३ मंडळांत तुरळक पावसाची सर झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी १३ मंडळात तुरळक पाऊस झाला.    मराठवाड्याच्या ‘केसर’वर आघात 

जवळपास १९ हजार हेक्‍टरवर केशर आंब्यांच्या बागा आहेत. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे आधीच केसरचे उत्पादन लांबणीवर पडले. शिवाय १२ ते १४ मे दरम्यान केशर आंब्याच्या काही ठिकाणी लगडलेल्या बागांना निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसला. या अपघातातून वाचलेला केशर मे अखेरीस पाडाला आला. परंतु, काही उत्पादन हाती लागेल.

ही केशर आंबा उत्पादकांची आशा निराशेत बदलण्याचे काम एक जूनपासून वादळासह येत असलेल्या पूर्व मोसमी पावसाने केले. एकही आंबा हाती न लागण्याची स्थिती औरंगाबाद जिल्ह्यात निर्माण झाल्याची माहिती उत्पादकांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com