Agriculture news in marathi, Order for action on four sugar factories in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर कारवाईचे आदेश
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या जिल्ह्यातील चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना शुक्रवारी (ता.२०) दिले. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित कारखान्यांच्या साखर आणि बगॅस विक्रीतून वसुली करण्यात येणार आहे.

सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या जिल्ह्यातील चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना शुक्रवारी (ता.२०) दिले. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित कारखान्यांच्या साखर आणि बगॅस विक्रीतून वसुली करण्यात येणार आहे.

शरयू शुगर्स, बाळासाहेब देसाई कारखाना, ग्रीन पॉवर व न्यू फलटण शुगर्स या चार कारखान्यांचा यात समावेश आहे. खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड या कारखान्याने २०१८-१९ च्या हंगामातील गाळप उसाचे थकीत एफआरपी पाच कोटी दोन लाख ११ हजार रुपये थकीत आहेत. पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने २०१८-१९ च्या हंगामातील दोन कोटी ३३ लाख ५९ हजार रुपये थकीत ठेवले आहेत. फलटण तालुक्यातील शरयु अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडने २०१८-१९ च्या हंगामातील एफआरपीची १६ कोटी २३ लाख ७१ हजार रुपये देणे बाकी आहे. 

२०१७-१८ ऊस गाळप हंगामातील साखरवाडी येथील न्यू फलटण कारखान्याने एक कोटी ३८ लाख ८२ हजार रुपये थकविले आहेत. या चार कारखान्यांकडे एकूण २४ कोटी ९७ लाख रुपये इतकी एफआरपीची थकीत रक्‍कम आहे. ही रक्‍कम वेळेत न दिल्यास त्यावर १५ टक्‍के व्याजदर आकारण्यात येणार आहे. वसुलीसाठी साखर कारखान्यांतील उत्पादित साखर आणि बगॅस विक्रीतून शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत, असे आदेशात नमूद केले आहे. 

या कारवाईसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात २०१८-१९ मध्ये एकूण १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. या कारखान्यांनी ९५२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपोटी २३ हजार २९३ कोटी रक्‍कम देय होती. त्यापैकी २२ हजार ९१५ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. 

१३९ कारखान्यांनी दिली पूर्ण रक्कम 

राज्यात यंदाच्या हंगामात १३९ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्‍कम दिली आहे. ४५ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्‍के, आठ कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के, तर तीन कारखान्यांनी ०० ते ५९ टक्के रक्‍कम दिली आहे. रक्कम एफआरपी थकविणाऱ्या ८६ कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली. काही कारखान्यांकडे ३९७ कोटी रुपये थकीत असून, हे प्रमाण केवळ १.७१ टक्‍के आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...