agriculture news in marathi, Order for action on Gangakhed shuger factory | Agrowon

गंगाखेड कारखान्यावर कारवाईचे आदेश

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 मे 2019

परभणी : एफआरपीनुसार थकीत ऊस बिल देण्यासाठी गंगाखेड शुगर अॅंड एनर्जी लि. माखणी (ता. गंगाखेड, जि. परभणी) या साखर कारखान्यावर आरआरसीनुसार कारवाई करावी. साखर, बायोगॅस आदी उत्पादनासह कारखान्याची मालमत्ता जप्त करवी. त्यांच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांची देणी व्याजासह अदा करावी, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी (ता. ६) दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

परभणी : एफआरपीनुसार थकीत ऊस बिल देण्यासाठी गंगाखेड शुगर अॅंड एनर्जी लि. माखणी (ता. गंगाखेड, जि. परभणी) या साखर कारखान्यावर आरआरसीनुसार कारवाई करावी. साखर, बायोगॅस आदी उत्पादनासह कारखान्याची मालमत्ता जप्त करवी. त्यांच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांची देणी व्याजासह अदा करावी, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी (ता. ६) दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१८-१९ च्या गाळप हंगामात घातलेल्या उसाचे बिल देण्यास गंगाखेड साखर कारखान्याने चार महिने विलंब लावला. त्यामुळे या कारखान्यावर आरआरसीची कारवाई करावी. एफआरपीनुसार थकीत ऊसबिल देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली (ज्ञानोबा) कदम, विश्वंभर गोरवे आदींसह शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ६) पुणे येथे गायकवाड यांची भेट घेऊन केली होती. एफआरपीनुसार ऊस देणी मिळण्यासाठी योग्य कार्यवाही केली जात नाही, तोपर्यंत साखर आयुक्त कार्यालयातून हलणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. 

या कारखान्याकडील २०१८-१९ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची ३२ कोटी १ लाख ९५ हजार रुपये एवढ्या रकमेवर १५ टक्के दराने व्याजाची आकारणी करावी. ही रक्कम कारखान्याकडून जमिनी महसुलाची थकबाकी समजावी. कारखान्याने उत्पादित केलेल्या प्रथम प्राधान्याने नॅान प्लेज साखर, मोलॅसिस आणि बॅगस तसेच आवश्यकतेनुसार प्लेज साखर आदी उत्पादनांची विक्री करावी. त्यामधून रक्कम वसूल करावी. गरज पडल्यास कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी. मालमत्तेची जप्ती करून विहित पद्धतीने विक्री करून येणाऱ्या रकमेतून विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह संबंधित शेतकऱ्यांची देणी अदा करावी, असे आदेश गायकवाड यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...