Agriculture news in marathi The order for chicken, egg shops needs clarity | Page 2 ||| Agrowon

चिकन, अंडी दुकानांसाठी आदेशात स्पष्टता हवी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ या आदेशात कडक निर्बध लागू केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात भाजीपाला व दूध यांचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र चिकन व अंडी यांचा नसल्याने काही स्थानिक यंत्रणा व पोलिस अडचणी आणत आहे.

नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ या आदेशात कडक निर्बध लागू केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात भाजीपाला व दूध यांचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र चिकन व अंडी यांचा नसल्याने काही स्थानिक यंत्रणा व पोलिस अडचणी आणत आहे. त्यामुळे चिकन व अंडी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी. यासह आदेशात स्पष्टता आणावी, अशी मागणी महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोसिएशनने राज्य सरकारकडे केली आहे. 

मागील वर्षी कोरोनाविषयक अफवांमुळे पोल्ट्री उद्योग मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला होता. सुरुवातीला यंत्रणांचे सहकार्य न झाल्याने नुकसान वाढले. मात्र नंतरच्या काळात राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतले. आजवर कोरोना व त्यानंतर बर्ड फ्ल्यूच्या संकटात पोल्ट्री उद्योगाचे राज्यात २२०० कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले. आता हे संकट मागील काही दिवसांत कमी झाले असले. तरी राज्यात होणाऱ्या साडेचार कोटी पक्षी प्लेसमेंट पैकी ३ कोटींवर आहे. त्यात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत असल्याने सद्यःस्थितीत चिकन व अंडी विक्रीबाबत स्पष्ट खुलासा आदेशात नाही. त्यामुळे असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पशुसंवर्धन आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ग्राहकांमध्ये चिकन व अंडीची मागणी वाढती आहे. सरकारने ही कोरोना काळात सशक्त आहार घेण्याचे आवाहन केले आहे. त्यात उत्पादन मर्यादित असल्याने पुरवठा कमी असल्याची स्थिती आहे. मात्र सध्या कडक निर्बंध असल्याने नव्या आदेशात स्पष्टता नसल्याने काही ठिकाणी अडचणी येत आहेत. सरकारने ही बाब लक्षात घ्यावी अन् सुधारित आदेश काढून चिकन व अंडी यांचा समावेश करून दिलासा द्यावा. 
- उद्धव अहिरे, व्यवस्थापकीय संचालक, आनंद अॅग्रो ग्रुप 

राज्यात काही जिल्ह्यांत नव्या आदेशात काही ठिकाणी चिकन, अंडी यांचा उल्लेख आहे. तर काही ठिकाणी नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस प्रशासनाकडून अडचणी येऊ नये यासाठी राज्य सरकारकडे पत्र दिले आहे. यावर मोठा रोजगार अवलंबून असल्याने याचा विचार व्हावा. 
- वसंतकुमार शेट्टी, अध्यक्ष-महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोसिएशन 


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...