Agriculture news in marathi Order to conduct damages in Nanded | Agrowon

नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून संबंधित तहसील कार्यालयाला कळवावे’’, असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. या वेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठच्या पिकांना बाधा पोचली. या सोबतच सखल भागातील शेतातही पाणी साचून पिकांचे नुकसान झाले. यात काही नागरिकांना जीवही गमवावा लागला.

अतिवृष्टीमुळे शेतीपिकासह फळपिकांच्या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व १६ तहसीलदारांना नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. 
शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांच्यावर तसेच त्यापेक्षा कमी असल्यास कळवावेत. ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांनी तत्काळ संयुक्त पंचनामे करून संबंधित तहसील कार्यालयाला कळवावे. पंचनामे केलेले फोटो तसेच इतर पुरावा गावनिहाय जतन करण्याचे आदेश देण्यात आले.

सरसकट पंचनाम्याची मागणी

जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे शेतीपिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरामुळे नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वैयक्तिक पंचनामे न करता सरसकट नुकसान दाखवून अडचणीतील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...