Agriculture news in Marathi, order for criminal offense for misuse of kandari water scheme, jalgaon, maharashtra | Page 2 ||| Agrowon

कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी फौजदारीचे आदेश

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने पाणी योजनेची १ लाख २४ हजार रुपयांची रक्‍कम परस्पर काढून घेतली आहे. यामुळे गावात पुरेसे पाणी मिळू शकले नाही. शिवाय, विस्तार अधिकारी हे चुकीचा रिपोर्ट सादर करून समितीने कोणतेही काम न केल्याने समिती बरखास्त करण्याबाबत नियमबाह्य ग्रामसभा घेऊन नियमबाह्य ठराव केला आहे. हा प्रकार आजच्या जलव्यवस्थापन सभेत उपस्थित झाल्यानंतर कंडारी येथील समिती अध्यक्ष व सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी दिले.

जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने पाणी योजनेची १ लाख २४ हजार रुपयांची रक्‍कम परस्पर काढून घेतली आहे. यामुळे गावात पुरेसे पाणी मिळू शकले नाही. शिवाय, विस्तार अधिकारी हे चुकीचा रिपोर्ट सादर करून समितीने कोणतेही काम न केल्याने समिती बरखास्त करण्याबाबत नियमबाह्य ग्रामसभा घेऊन नियमबाह्य ठराव केला आहे. हा प्रकार आजच्या जलव्यवस्थापन सभेत उपस्थित झाल्यानंतर कंडारी येथील समिती अध्यक्ष व सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर पाटील, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, सदस्य प्रभाकर सोनवणे, पल्लवी सावकारे, लालचंद पाटील, मीना पाटील आदी उपस्थित होते. शासनाच्या स्वच्छ महोत्सवात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांचे सेमिनार घ्यावयाचे आहे. हे सेमिनार जिल्हास्तरावर न घेता तालुकास्तरावर घेण्याची मागणी प्रभाकर सोनवणे यांनी केली.

कंडारी येथील समितीकडून झालेल्या गैरप्रकाराबाबत पल्लवी सावकारे यांनी मुद्दा उपस्थित केला. यात प्रामुख्याने समितीने काम न करता २२ मे २०१८ ला १ लाख २४ हजार इतकी रक्‍कम काढून घेतली आहे. या समिती अध्यक्ष व सचिवांवर कारवाईची मागणी केली. तसेच, विस्तार अधिकारी पाटणकर यांनी देखील चुकीचा रिपोर्ट सादर केल्याने त्यांच्यावरसुद्धा कारवाईची मागणी सावकारे यांनी केली होती. या प्रकाराबाबत अन्य तालुक्‍यांतील अधिकारी नेमून चौकशी करण्याची मागणी प्रभाकर सोनवणे यांनी 
केली आहे.

मारूळ येथेही काम अपूर्ण 
मारूळ (ता. यावल) येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत ६० लाख ९६ हजार रुपयांचे काम मंजूर आहे. परंतु, संबंधित ठेकेदार मनोरे हे काम करीत नसून पाणी योजनेचे काम अपूर्ण असल्याची तक्रार प्रभाकर सोनवणे यांनी केली. गावात तीन किलोमीटरची पाइपलाइन टाकणे असताना केवळ दीड किलोमीटर पाइपलाइन टाकली तसेच पंपहाउसचे काम देखील अपूर्ण आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी सोनवणे यांनी केली. यावर सीईओंनी काम पूर्ण झाल्याशिवाय बिल अदा न करण्याचे आदेश दिले.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात विमा योजनांच्या नूतनीकरणास...कोल्हापूर : जिल्ह्यातील ११ लाख ७२ हजार बँक...
निम्न दुधना प्रकल्पामधील उपयुक्त...परभणी ः परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न...
महापुराच्या मुकाबल्यासाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रलंबित मागण्यांसाठी...
‘पंदेकृवि’ची उद्या राज्यस्तरीय कापूस...अकोला : लवकरच खरीप हंगाम येऊ घातला आहे. राज्याचा...
फुले कृषी विद्यापिठाकडून व्हॉट्सअॅपवर...पुणे (प्रतिनिधी) ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ...
हमीभावासाठी अंगाला हळद लावून आज आंदोलन...वाशीम: हळदीला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या...
वातावरणातील बदलाचे रोगकिडीवर होणारे...वातावरणातील घटकांचे ज्या प्रमाणे मानवावर परिणाम...
कथित अफवेचा टोमॅटो रोपांच्या मागणीवर...कोल्हापूर: कोरोनापेक्षा घातक व्हायरस टोमॅटोवर...
अकोला जिल्ह्यात आता दिवसाला हजार...अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया...
जळगावात एक क्विंटल कापसामागे चार किलोची...जळगाव : एक क्विंटल कापसामागे चार किलो कापसाची...
‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी माजी...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
अकोला झेडपी शेतकऱ्यांना अनुदानावर देणार...अकोला  ः यंदा विविध संकटांमुळे हवालदिल...
नगर जिल्ह्यात ७१ हजार ६६५ क्विंटल तूर...नगर  ः नगर जिल्ह्यात नाफेडने सुरु केलेल्या...
खानदेशात गोदामांअभावी मका खरेदीला विलंब...जळगाव  ः खानदेशात मक्‍याच्या शासकीय...
औरंगाबादमध्ये १६७५ टन खते, ६० क्विंटल...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...
शासन करणार ५० हजार टन युरियाचा बफर... नगर  : राज्यात खरीप हंगामाची तयारी...
वाघूर नदीकाठी पाटचारीत आवर्तन सोडा,...जळगाव  ः वाघूर नदीकाठी व शिवारातील टंचाई...
औरंगाबाद जिल्हयात मागणीनुसार ८ हजारावर...औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन... बुलडाणा   ः जिल्ह्यातील...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...