Agriculture news in marathi Order of crop panchnama in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या पंचनाम्यांचे आदेश

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील मूग, उडीद भिजला, तर ऊस, कांदा, डाळिंब पिकांचेही मोठे नुकसान झाले.

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील मूग, उडीद भिजला, तर ऊस, कांदा, डाळिंब पिकांचेही मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला तालुक्याला त्याचा सर्वाधिक फटका बसला. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. आठवडाभरात या पंचनाम्याचे अहवाल देण्यास सांगितले आहे. 

होटगी (ता. दक्षिण सोलापूर) तलाव भरल्याने सांडव्यातून पाणी वाहत आहे. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी, मंगळवेढा तालुक्यातील मारापूर, सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी, अनकढाळ, वझरे, मिसाळवाडी, राजुरी, वाटंबरे, एखतपूर या भागात डाळिंब, कांदा भाजीपाला पिकासह अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातही पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपुरातील कासेगाव, खर्डी येथील द्राक्ष, डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. 

जमीन खरडली, उडीद, मूग भिजला

पावसामुळे अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. त्याशिवाय उपरी, सुपली, पळशी येथेही दमदार पावसाने शेतीचे नुकसान झाले. अनेकांचा काढलेला मूग, उडीद भिजून गेला. माळशिरस तालुक्यातही वेळापूर, माळशिरस, निमगाव, मळोली, अकलूज भागात चांगला पाऊस झाला. या भागातही डाळिंबासह ऊसाचे नुकसान झाले. दरम्यान, आता या सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तहसिलदारांना दिले आहेत. येत्या आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल द्यावा, असेही त्यांनी म्हंटले आहे.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...