agriculture news in Marathi order for cut gokul water and electricity Maharashtra | Agrowon

`गोकुळ'चे पाणी, वीज तोडण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

कोल्हापूर ः तृत्तीय व चतुर्थ संवर्गातील कर्मचाऱ्यांत प्रकल्पबाधित कर्मचाऱ्यांची माहिती न दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्य कार्यालयासह ताराबाई पार्कातील कार्यालयाचे पाणी व वीजपुरवठा तोडण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिले. ही कारवाई एक फेब्रुवारीपासून होणार असून, या निर्णय जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 

कोल्हापूर ः तृत्तीय व चतुर्थ संवर्गातील कर्मचाऱ्यांत प्रकल्पबाधित कर्मचाऱ्यांची माहिती न दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्य कार्यालयासह ताराबाई पार्कातील कार्यालयाचे पाणी व वीजपुरवठा तोडण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिले. ही कारवाई एक फेब्रुवारीपासून होणार असून, या निर्णय जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासनाचे सहाय्य घेतलेल्या सहकारी संस्थांत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांत प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. नव्याने भरती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांत प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शासनाच्या अध्यादेशानुसार ‘गोकुळ'' ला माहिती सादर करण्याचे आदेश श्री. काटकर यांनी यापूर्वीच दिले होते.

याविरोधात संघाच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तथापि ही याचिका १ फेब्रुवारी २०१९ रोजी फेटाळून अपर जिल्हाधिकारी यांनी मागितलेली माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही माहिती न दिल्याबद्दल संघाला नोटीसही बजावण्यात आली होती. 

‘गोकुळ'' चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी त्यावर १३ ऑगस्ट २०१८ रोजी सादर केलेल्या लेखी म्हणण्यानुसार नव्याने भरती केली नसल्याचे सांगितले होते. भविष्यात नोकर भरती करताना याची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन दिले होते. म्हणून कोणतीही कारवाई संघावर करू नये, असे या खुलाशात म्हटले होते.

तथापि अपर जिल्हाधिकारी यांनी सध्या कार्यरत असलेल्या "गोकुळ''च्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवून त्यात प्रकल्पग्रस्तांची संख्या किती आहे, अशी लेखी विचारणा केली होती. तरीही संघाने ही माहिती दिली नव्हती म्हणून यावर १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुनावणी घेण्यात आली. त्यात संघाच्यावतीने ॲड. लुईस शहा यांनी लेखी म्हणणे सादर केले. त्यानंतर अनेकदा यावर सुनावणी झाली. 

अंतिम सुनावणी ३० डिसेंबर २०१९ रोजी झाली. त्यात ॲड. शहा यांनी ‘गोकुळ'' ने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसल्याची माहिती दिली. तरीही या कार्यालयाने मागितलेली आवश्‍यक ती माहिती देण्यास पुरेसा वेळ देऊन ‘गोकुळ'' ने ही माहिती दिली नव्हती. यावरून संघात प्रकल्पग्रस्तांची भरतीच झाली नसल्याची बाब समोर आली.

या संदर्भातील कायदेशीर बाबींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून ‘गोकुळ'' च्या गोकुळ शिरगाव व ताराबाई पार्कातील कार्यालयाचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश श्री. काटकर यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरण व जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...