शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
‘शिंदे शुगर्स’ चेअरमनविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
शेतकऱ्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याप्रकरणी ‘शिंदे शुगर्स’ चेअरमनविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सोलापूर : शेतकऱ्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याप्रकरणी तुर्कपिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्यासह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक आणि एका अनोळखी व्यक्तीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश बार्शीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राहुल धडके यांनी दिले आहेत.
याबाबतची माहिती अशी, की बाभूळगाव येथील शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे यांनी संबंधित कारखान्याचे सभासदत्व घेताना आधार कार्ड, पॅन कार्ड कारखान्यास दिले होते. चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी त्या आधारे बनावट स्वाक्षरीने कागदपत्रे तयार केली. येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी यांच्याशी संगनमत करून श्रीहरी शिंदे यांच्या जागी एका अनोळखी इसमाला उभे करून कर्ज मागणीचे प्रकरण दाखल केले.
दरम्यान, त्यासाठी बँकेत बनावट खाते उघडले. २८ सप्टेंबर २०१६ रोजी शिंदे यांच्या नावे तीन लाखांचे कर्ज उचलले. या कर्जाला रणजितसिंह शिंदे हे जामीन होते.
कर्ज थकल्यानंतर दिली नोटीस..
विशेष म्हणजे बँकेने कर्जाची रक्कम ही जामीनदाराच्याच हवाली केली. हे कर्ज थकल्यानंतर बँकेने श्रीहरी शिंदे यांना नोटीस दिली. त्यानंतर त्यांनी बँकेत चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यावर रणजितसिंह शिंदे यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आठ दिवसांत सर्व कर्ज फेडण्याची त्यांना लेखी हमी दिली. मात्र ते फेडले नाही. शेतकरी शिंदे यांनी या फसवणुकीबाबत पोलिसांकडे दाद मागितली. मात्र त्यांनी दखल न घेतल्यामुळे अॅड. आर. यू. वैद्य यांच्यामार्फत न्यायलयात धाव घेतली असता. न्यायालयाने याप्रकरणी आता गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिले आहेत.
- 1 of 1055
- ››