agriculture news in marathi Order to file a case against Shinde Sugars chairman | Agrowon

‘शिंदे शुगर्स’ चेअरमनविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

शेतकऱ्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याप्रकरणी ‘शिंदे शुगर्स’ चेअरमनविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सोलापूर : शेतकऱ्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याप्रकरणी तुर्कपिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्यासह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक आणि एका अनोळखी व्यक्तीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश बार्शीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राहुल धडके यांनी दिले आहेत. 

याबाबतची माहिती अशी, की बाभूळगाव येथील शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे यांनी संबंधित कारखान्याचे सभासदत्व घेताना आधार कार्ड, पॅन कार्ड कारखान्यास दिले होते. चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी त्या आधारे बनावट स्वाक्षरीने कागदपत्रे तयार केली. येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी यांच्याशी संगनमत करून श्रीहरी शिंदे यांच्या जागी एका अनोळखी इसमाला उभे करून कर्ज मागणीचे प्रकरण दाखल केले. 

दरम्यान, त्यासाठी बँकेत बनावट खाते उघडले. २८ सप्टेंबर २०१६ रोजी शिंदे यांच्या नावे तीन लाखांचे कर्ज उचलले. या कर्जाला रणजितसिंह शिंदे हे जामीन होते. 

कर्ज थकल्यानंतर दिली नोटीस..
विशेष म्हणजे बँकेने कर्जाची रक्कम ही जामीनदाराच्याच हवाली केली. हे कर्ज थकल्यानंतर बँकेने श्रीहरी शिंदे यांना नोटीस दिली. त्यानंतर त्यांनी बँकेत चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यावर रणजितसिंह शिंदे यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आठ दिवसांत सर्व कर्ज फेडण्याची त्यांना लेखी हमी दिली. मात्र ते फेडले नाही. शेतकरी शिंदे यांनी या फसवणुकीबाबत पोलिसांकडे दाद मागितली. मात्र त्यांनी दखल न घेतल्यामुळे अॅड. आर. यू. वैद्य यांच्यामार्फत न्यायलयात धाव घेतली असता. न्यायालयाने याप्रकरणी आता गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिले आहेत.


इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा...
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूचम्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत...
मराठवाड्यात उपयुक्त पाणी ६५.८० टक्केचऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांतील उपयुक्त...
`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे...हिंगोली : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना...
अवकाळीच्या नुकसानीचे नांदेडमध्ये १८...नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी...
शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण...
साडेसात हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण...नांदेड : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘ई-फेरफार प्रणालीत नाशिक विभागाची बाजी’नाशिक : ‘‘महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीत...
शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे मारता, देश...मुंबई : ‘‘दिल्लीत शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत....
भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्यांच्या समक्षच...भंडारा : जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र आणि सरासरी...
वाईत हळदीला उच्चांकी भावसातारा : शेतकऱ्यांचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
अकोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ....अकोला : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती...मुंबई : राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष...
मुंबई बाजार समितीत खरेदी-विक्री होणार...पुणे ः बदलत्या पणन कायद्यांमुळे बाजार...
महागाई विरोधात स्वाभिमानीचे लवकरच...कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने...
दोन आठवड्यांत ‘एफआरपी’चे सव्वादोन हजार...पुणे : साखरेला कमी भाव व निर्यातीत अनेक समस्या...
काजू खरेदी करताना आडकाठी केल्यास पोलिस...सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी-दोडामार्ग फळ बागायतदार...
विदर्भात कमाल तापमानात वाढपुणे ः कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढू...
‘म्हैसाळ’चे पाणी बंदिस्त पाइपद्वारे...सांगली ः जलसंपदा विभागाद्वारे म्हैसाळ योजनेच्या...
कायदा मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा...उत्तूर, जि. कोल्हापूर : आधी पुनर्वसन मग धरण हा...