agriculture news in Marathi, order to monsanto to gave two thousand crore to farmer, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दोन हजार कोटींची भरपाई देण्याचा मोन्सॅन्टोला आदेश

वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : मोन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीने अमेरिकेतील एका कर्करोग (कॅन्सर) पीडित शेतकऱ्याला दंड आणि नुकसानभरपाई मिळून तब्बल २८९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे दोन हजार कोटी रुपये) द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मोन्सॅन्टोचे उत्पादन असलेल्या राऊंडअप (ग्लायफोसेट) तणनाशकाच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा त्या शेतकऱ्याचा दावा मान्य करत कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने हा निकाल दिला.

नवी दिल्ली : मोन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीने अमेरिकेतील एका कर्करोग (कॅन्सर) पीडित शेतकऱ्याला दंड आणि नुकसानभरपाई मिळून तब्बल २८९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे दोन हजार कोटी रुपये) द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मोन्सॅन्टोचे उत्पादन असलेल्या राऊंडअप (ग्लायफोसेट) तणनाशकाच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा त्या शेतकऱ्याचा दावा मान्य करत कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने हा निकाल दिला.

ड्वेन जॉन्सन (वय ४६) असे या शेतकऱ्याचे नाव असून ते कीड नियंत्रण व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्यांनी दरवर्षी ३० वेळा या प्रमाणात राऊंडअप तणनाशकाचा वापर केला. या तणनाशकाच्या वापरामुळे आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे सांगत त्यांनी मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. जॉन्सन यांचा आजार शेवटच्या अवस्थेत असून २०२० नंतर ते जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खटल्याची चार आठवड्यांत फास्ट्र ट्रॅक सुनावणी पूर्ण करण्यात आली.

ग्लायफोसेट विशेषतः राऊंडअपमुळे कॅन्सर होतो हे माहीत असूनही मोन्सॅन्टोने ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा नफ्याला प्राधान्य दिल्याचा आरोप जॉन्सन यांच्या वकिलांनी केला. मोन्सॅन्टोने आपल्या उत्पादनामुळे कॅन्सर होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा जॉन्सन आणि आपल्या इतर ग्राहकांना दिलेला नव्हता, असे न्यायालयाला आढळून आले.  

मोन्सॅन्टोने या निकालाला वरच्या न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. सुमारे आठशेहून अधिक शास्त्रीय अभ्यास आणि परीक्षणांमधून ग्लायफोसेट कर्करोग होण्यास कारणीभूत नाही, हे सिद्ध झालेले असून या निकालामुळे ती वस्तुस्थिती बदलत नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. 
दरम्यान, अमेरिकेत जॉन्सन यांच्याप्रमाणे आणखी पाच हजार जणांनी मोन्सॅन्टोच्या विरोधात अशाच स्वरूपाच्या याचिका दाखल केलेल्या आहेत.

कर्करोग हाेत असल्याची ‘डब्ल्यूएचओ’कडून पुष्टी
यूनायटेड स्टेट्स एन्व्हायर्न्मेंट प्रोटेक्शन एजन्सीने सप्टेंबर २०१७ मध्ये ग्लायफोसेटमुळे कर्करोग होत नसल्याचा अहवाल दिला होता. परंतु ग्लायफोसेट कर्करोग होण्यास कारणीभूत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) २०१५ मध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या घटकांच्या यादीमध्ये ग्लायफोसेटचा समावेश केलेला आहे.


इतर अॅग्रो विशेष
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...