Agriculture news in marathi Order to retain administrator | Agrowon

संग्रामपूर बाजार समितीवर प्रशासक कायम ठेवण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यातील संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती कायम ठेवण्याचा आदेश पणन संचालकांनी दिला आहे. विद्यमान सत्तारूढ संचालक मंडळाविरुद्ध ही कारवाई मानली जात आहे. 

बुलडाणा  : जिल्ह्यातील संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती कायम ठेवण्याचा आदेश पणन संचालकांनी दिला आहे. विद्यमान सत्तारूढ संचालक मंडळाविरुद्ध ही कारवाई मानली जात आहे. 

बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक बसविण्याचा आदेश गेल्या काळात जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. या विरुद्ध विद्यमान सभापती गजानन दाणे व त्यांच्या समर्थक संचालकांनी पणन संचालकांकडे अपील करीत स्थगिती मिळवली होती. यावर संग्रामपूर बाजार समितीचे संचालक शांताराम दाणे व त्यांच्या सहकार विकास आघाडीच्या सहा संचालकांनी १३ जुलैला याचिका दाखल केली होती. यामध्ये विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली होती. तक्रारदारांकडून ॲड. विरेंद्र झाडोकार यांनी युक्तिवाद केला.

जिल्हा उपनिबंधकांनी दिलेला बाजार समिती बरखास्तीचा आदेश कायम ठेवा अशी मागणी केली. यावर पणन संचालकांनी आदेश मान्य करीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणनच्या नियमानुसार संग्रामपूर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्‍त करण्याचा आदेश दिला. बाजार समितीवर प्रशासक नेमण्याची सूचना आदेशाद्वारे कली आहे. या बाजार समितीसाठी २०१५मध्ये निवडणूक झाली होती. या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०२०मध्ये संपली आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबविता न आल्याने पणन खात्याने बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. या घडामोडींमुळे सहकार क्षेत्रात उलटसुलट चर्चांना सुरवात झाली आहे. सर्वांच्या नजरा आगामी निवडणुकीकडे लागल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
‘अटल भूजल’मध्ये जळगावातील चार तालुके जळगाव : तेरा जिल्ह्यांत एक हजार ३३९...
खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या...नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने...
करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य...करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा)...
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन...
चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन...गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून...
नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि...
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली...हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा...
पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा...नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने...
बटाटा लागवड ठरली फायदेशीरमहाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी,...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलनसातारा  : कृषी कायद्याविरोधात पंजाब व...
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटपअकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५...
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसररिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण...
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - ...यवतमाळ :  जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१...
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून...संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका...
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास केंद्र...कोल्हापूर : दोन दिवसांत दिल्लीतील...
गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदीगोंदिया : जिल्ह्यात हमीभावाने खरेदीसाठी सुरू...
अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘...पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे...
‘ग्रामविकास’कडून वर्षभरात लोकाभिमुख...कोल्हापूर : गेल्या एक वर्षांच्या कालावधीत...
शेतकऱ्यांना अडविणारे राजकारणातून संपणारवर्धा : देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी...