विठ्ठल साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

Order to seize property of Vitthal sugar factory
Order to seize property of Vitthal sugar factory

पंढरपूर, जि. सोलापूर (प्रतिनिधी) : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादकांची सुमारे ५ कोटी ७९ लाख रुपये इतकी एफआरपीची रक्कम थकीत आहे. ती वसूल करण्यासाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करावी, असे लेखी पत्र प्रादेशिक सहसंचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी थकीत एफआरपीबाबत कारवाई करावी, यासाठी साखर सहसंचालकांकडे लेखी तक्रार दिली. पाटील यांच्या तक्रारीनुसार सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालकांनी साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करावी, असे लेखी पत्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके हे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पंढरपूर तालुक्‍याचा आर्थिक कणा म्हणून श्री विठ्ठल कारखान्याकडे पाहिले जाते; परंतु कारखाना आर्थिक अडचणीत आल्यामुळे यंदा बंद आहे. त्यामुळे कामगार आणि शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. गाळप हंगाम २०१८-१९ मध्ये गाळप केलेल्या उसाची सुमारे ५ कोटी ७९ लाख रुपयांची एफआरपीची रक्कम गेल्या वर्षभरापासून थकीत आहे; तर  कामगारांचेही अनेक महिन्यांचे वेतन थकले आहे. सध्या थकीत वेतनावरून कामगार आणि संचालक मंडळातील वाद उफाळून आला आहे. त्यातच साखर आयुक्तांनी कारखान्यावर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे संकेत दिल्याने अडचण होणार आहे.

कारवाई अटळ ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे; परंतु कारखान्याने ती रक्कम अद्याप दिली नाही. एफआरपी थकवल्यामुळे साखर आयुक्तांनी १५ जुलै २०१९ रोजी कारखान्यावर आरआरसीची (मालमत्ता जप्त) कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. प्रादेशिक सहसंचालकांनी कारवाईचे पत्र दिल्याने जप्तीची कारवाई अटळ मानली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com