Agriculture news in Marathi Order to start Nafed shopping center in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यात नाफेडची खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

अकोला ः जिल्ह्यातील केंद्रावर नाफेडमार्फत हमी दराने तत्काळ खरेदी सुरू करावी, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिले. या बाबत तातडीच्या पत्राद्वारे त्यांनी विदर्भ मार्केटिंग फेडरेशन व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना सूचना केली.

अकोला ः जिल्ह्यातील केंद्रावर नाफेडमार्फत हमी दराने तत्काळ खरेदी सुरू करावी, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिले. या बाबत तातडीच्या पत्राद्वारे त्यांनी विदर्भ मार्केटिंग फेडरेशन व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना सूचना केली.

याबाबत राज्याच्या पणन मंत्र्यांनी मंगळवारी (ता. सात) व्हिडिओ कॉन्फरन्स घेत हमीभाव शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व केंद्र तातडीने सुरू करण्यात यावेत. या केंद्रावर शेतकऱ्यांनी शेतमाल आणण्याबाबत आपल्यास्तरावरून आवाहन केले जावे. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याची काळजी घ्यावी, असेही सुचविण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नाफेडची खरेदी बंद झालेली आहे. सध्याच्या शेतकऱ्यांच्या घरात तूर, हरभरा पडून आहे. 

बाजार समित्यांमध्येही व्यवहार अद्याप सुरू झालेले नसल्याने अडचणी वाढलेल्या आहेत. अशा स्थितीत नाफेडची खरेदी सुरू करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे ही खरेदी सुरू करण्याचे तातडीने आदेश देण्यात आले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...