agriculture news in Marathi order to start onion auction Maharashtra | Agrowon

कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी  प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 6 तास ठिय्या दिला.

नाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी  प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 6 तास ठिय्या दिला. लिलाव सुरू करा अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. अखेर पोलिस यंत्रणेने मध्यस्थी करत बैठकीनंतर तोडगा निघाला. कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 

शेतकरी असंघटित वर्ग असल्याने कांदा व्यापारी त्याचा फायदा घेऊन वेठीस धरत असल्याची तक्रार प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे केली. बाजार समित्यांचे पदाधिकारी व्यापाऱ्यांना जाब विचारणार नसतील तर बाजार समित्यांमध्ये प्रशासक नेमण्याची आग्रही भूमिका शरद शिंदे यांनी मांडली. यावर जिल्हा उपनिबंधक यांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून तातडीने दखल घेत जिल्ह्यातील बाजार समिती आवारात कांदा मार्केट सुरळीत करण्याबाबत लेखी आदेश काढले आहेत.

या कामकाजात व्यत्यय निर्माण करणाऱ्या बाजार घटकांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, बागलाण तालुकाध्यक्ष गणेश काकुलते, देवळा तालुकाध्यक्ष गणेश शेवाळे, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, चांदवड तालुकाध्यक्ष रामभाऊ बोरसे आदी उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...