agriculture news in Marathi, order of suggest drought relief works, Maharashtra | Agrowon

दुष्काळात रोजगार देणारी कामे सुचविण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

पुणे : गंभीर दुष्काळाची गावे अद्याप जाहीर झालेली नसली तरी यंदा ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्यामुळे मजुरी देणारी कामे सुचविण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेले आहेत. 

राज्याच्या मृद् व जलसंधारण विभागामार्फत जिल्हास्तरीय कामांबाबत आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कृषी आयुक्तालयातील जलसंधारण संचालक डॉ. कैलास मोते यांच्याकडून दुष्काळात रोजगार निर्मिती करणाऱ्या कामांच्या नियोजनाचा सध्या आढावा घेतला जात आहे.

पुणे : गंभीर दुष्काळाची गावे अद्याप जाहीर झालेली नसली तरी यंदा ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्यामुळे मजुरी देणारी कामे सुचविण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेले आहेत. 

राज्याच्या मृद् व जलसंधारण विभागामार्फत जिल्हास्तरीय कामांबाबत आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कृषी आयुक्तालयातील जलसंधारण संचालक डॉ. कैलास मोते यांच्याकडून दुष्काळात रोजगार निर्मिती करणाऱ्या कामांच्या नियोजनाचा सध्या आढावा घेतला जात आहे.

‘‘कपार्टमेंट बंडिंग, ग्रेडर बंडिग, सीसीटी व शेततळ्याची कामे दुष्काळी स्थितीत वाढविता येतील. यामुळे ग्रामीण भागात अडचणीत आलेल्या शेतकरी, शेतमजुरांना कामे मिळतील व कामांचा लाभ भविष्यात पिकाच्या उत्पादनवाढीला देखील होईल,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

दुष्काळी स्थितीबाबत राज्यात सध्या महसूल विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात नुकसानीचे अंदाजित प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास मध्यम आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्यास गंभीर दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. दुष्काळी स्थिती जाहीर होताच विविध उपाययोजनांपैकी रोजगाराची हमी देणारी कामे उपलब्ध करून देणे ही एक मुख्य जबाबदारी शासनाकडे येणार आहे. त्यामुळे सुरवातीपासून मजूर निर्मिती करणाऱ्या कामांचे आराखडे तयार करण्याकडे मृदसंधारण विभागाचा कल आहे. 

‘‘जलयुक्त शिवारातून शेततळे खोदाईला सव्वादोन लाखांपर्यंत अनुदान मिळते. त्यासाठी होणारी तीन मीटरची खोदाई बहुतेक ठिकाणी यंत्राच्या साह्याने होते. मात्र, एक मीटरपर्यंतची खोदाई मजुरामार्फत करण्याची तरतुद मूळ योजनेत आहे. त्यामुळे एक मीटर खोदाई मजुराकरवी व दोन मीटर खोदाई यंत्राकडून झाल्यास शेतकऱ्यांची संख्या वाढेल आणि हातांना कामदेखील मिळेल,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यात सध्या मजुरांच्या माध्यमातून तळ्यांच्या खोदाईला प्रतिसाद वाढला आहे. जलयुक्त शिवारातून दुष्काळात कामे वाढविल्यास जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणारी आणि पाणी मुरवणारी कामे मोठ्या प्रमाणात करता येतील. त्याचा लाभ पुढील खरीप व रबी हंगामाला होईल, असा अंदाज जलसंधारण विभागाचा आहे. 

दुष्काळी स्थिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना देखील गती देता येईल, असे सांगण्यात आले. रोजगार हमी योजनेतून २६० कामांचे एकत्रिकरण करण्यास मान्यता आहे. यात बंधारा, माती धरण, स्टॉप डॅम, चेकडॅम, सीसीटी, समपातळी बांध, गॅबियन स्ट्रॅक्चर, बोल्डर चेक, कालवा नुतणीनकर, तलावातील गाळ काढणे, वृक्ष लागवड व फळबाग लागवड, कुरण विकास, बांबू लागवड याशिवाय सरकारी जमिनींच्या विकासाची कामे देखील करता येणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
महाविकास आघाडीची समन्वय समिती होणार...मुंबई  ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...
बाजार समित्यातील ‘शेतकरी मतदाना’चा हक्क...पुणे  : बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये...
जळगावात बटाटा ८०० ते १८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कांदा पिकासाठी सिलिकॉनचा वापर फायदेशीरसिलिकॉनच्या वापराने नत्रयुक्त खतांची उपलब्धता २०...
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...